जळगाव पोलीसांनी उधळला मोठा गँगवार चा प्लान
३५ लाखांची सुपारी घेणाऱ्या अंतर जिल्हा पाथरोड गैंग मधील ५ शार्प शूटर्स ला अटक, ०४ गावठी कट्टे, ०९ जिवंत काडतुसे व ६२ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त
जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी पोलीस दलाने एक अत्यंत धाडसी आणि शिताफीची कामगिरी करत जळगाव शहरात होणारा संभाव्य गँगवार व तिहेरी हत्याकांडाचा मोठा कट उधळून लावला आहे.

३५ लाखांच्या सुपारीचा होता कट –
भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडात फरार असलेले कुख्यात गुन्हेगार बंटी पथरोड व शिव पथरोड यांनी भुसावळ येथील मिथुन बारसे, क्रिश बारसे, करण यांचा खून करण्यासाठी ३५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यातील ५ लाख रुपये ॲडव्हान्स घेतल्याचे तपासात समोर आले. दि. ११/१०/२०२६ रोजी मध्यरात्री जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात कार्यक्रमासाठी आलेल्या टार्गेटवर हल्ला करून त्यांना जीवे ठार मारून त्यांच्या अंगावरील सोने लुटणे, असा या आंतरजिल्हा टोळीचा भयंकर कट होता.
जळगाव पोलिसांचा सापळा व दरोड्याच्या तयारीचा पर्दाफाश
रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री पिंप्राळा परिसरातील भवानीमाता मंदिर ते सिल्लेमील जवळील मोकळ्या जागेत अत्यंत शिताफीने सापळा रचण्यात आला. इनोव्हा कार (MH-१९-AE-१३५५) वर छापा टाकून पोलिसांनी ०५ सराईत आरोपींना ताब्यात घेतले.
या घटनेत अटक आरोपी खालील प्रमाणे आहेत .
१) खुशाल गजानन बोरसे, रा. खडक रोड, भुसावळ
२) संदिप बबन लोंढे, रा. वाघनगर, जळगाव
३) राजू उर्फ ओमकार भदरगे, रा. शास्त्री नगर, ठाणे
४) अरविंद विजय कांबळे, रा. कासोळा, जि. वाशिम
५) सोनू महेंद्र जयस्वाल, रा. सातिवली, वसई, जि. पालघर
यांच्याकडून जागेवरच ०२ गावठी कट्टे, ०७ जिवंत काडतुसे, धारदार सुरा, कोयता, मिरची पावडर, दोऱ्या, मास्क व ५ मोबाईल फोन तसेच इनोव्हा कार असा एकूण ९,७७,६०० रुपयांचा मुद्देमाल व दोन लाखाचे अंमली पदार्थ असे ११ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
घरझडतीत आणखी शस्त्रास्त्रे व ६२ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त – पोलिसांचा दुहेरी दणका*

अटक आरोपींकडे कौशल्यपूर्ण सखोल चौकशी केली असता, त्यांनी खुनाच्या कटासाठी उमाळा (ता. जि. जळगाव) येथे एक खोली भाड्याने घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ पंचांसमक्ष सदर भाड्याच्या घराची झडती घेतली. या झडतीमध्ये आणखी ०२ गावठी पिस्तूल, ०२ जिवंत काडतुसे, विक्रीसाठी ठेवलेले एकूण ६२ ग्रॅम मेफेड्रोन (MD Powder) हा अमली पदार्थ व एक इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण २,२२,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
*या धडक कारवाईत एकूण ०४ गावठी कट्टे, ०९ जिवंत काडतुसे व ६२ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात जळगाव पोलिसांना मोठे यश आले आहे.*
गुन्हा दाखल व मुख्य सूत्रधारांवर वाढीव कलमे*
या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २९९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य, कटातील सहभाग तसेच घरझडतीत आढळलेली शस्त्रास्त्रे व अमली पदार्थ विचारात घेऊन मूळ गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(४), ३१०(५), हत्यार कायदा कलम ३/२५, ४/२५, गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी BNS कलम ६१(२) तसेच एनडीपीएस (NDPS) कायदा कलम ८(क), २२(क) या वाढीव कलमांची नोंद करण्यात आली आहे. तसेच सदरचे कटकारस्थान रचणारे मुख्य सूत्रधार बंटी पथरोड, शिव पथरोड, अभिषेक गोयर व मध्यस्थ रवी होळकर यांची आरोपी म्हणून गुन्ह्यात वाढ केली आहे.
वेळेवर केलेल्या या धाडसी कारवाईमुळे जळगाव शहर व भुसावळ परिसरातील संभाव्य गँगवार आणि हत्याकांडाचा कट उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
आरोपींची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी*
अटक व फरार आरोपींची पार्श्वभूमी अत्यंत गंभीर स्वरूपाची असून त्यांच्यावर यापूर्वी खून (३०२), खुनाचा प्रयत्न (३०७), दरोडा (३९५), जबरी चोरी (३९२), चोरी (३७९) व हत्यार कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. मुख्य सूत्रधार बंटी पथरोड याच्यावर एकट्यावर १९ तर शिव पथरोड याच्यावर १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
जळगाव पोलिसांच्या या सतर्कतेमुळे आणि धाडसी कामगिरीमुळे शहरात मोठा अनर्थ रोखण्यात पोलिसांना यश मिळाले आहे
सदरची धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक श्री. मधुकर साळवे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सचिन रणशेवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. दीपक जगदाळे, श्री. संतोष पवार, श्री. जितेंद्र वल्टे, सहायक पोलीस निरीक्षक श्री. अंकुश वारुंगसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. जितेंद्र राजपूत, पोलीस नाईक श्री. योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल श्री. सुमेध इंधाटे, श्री. मुकुंद गवते, श्री. मनोज मराठे, श्री. सागर देवरे, श्री. प्रसाद जोशी, श्री. सुधाकर अंबारे, श्री. अनिल सोननी व श्री. अतुल चौधरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ/अतुल वजांरी, सुनिल दामोदरे पोहेकॉ/किशोर पाटील, प्रविण भालेराव, अक्रम शेख, विजय पाटील, मुरलीधर धनगर, संदिप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, पोकॉ/राहुल रगडे, छगन तायडे, रविंद्र कापडणे, ईश्वर पाटील, प्रदिप सपकाळे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, मयुर निकम यांचे विशेष पथकांनी उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

