Wednesday, October 14, 2026
Homeजळगावसप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन परतताना अपघात; भाविकाचा मृत्यू

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन परतताना अपघात; भाविकाचा मृत्यू

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन परतताना अपघात; भाविकाचा मृत्यू

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – सप्तशृंगी गडावरून देवीची पायी ज्योत घेऊन परतणाऱ्या भोरस खुर्द येथील नवदुर्गा मित्र मंडळाच्या सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मुंबई महामार्गावरील सौंदाणे फाट्याजवळ १० ऑक्टोबर रोजी दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात आनंद परमेश्वर पाटील (वय ३९) यांचा मृत्यू झाला.

भोरस खुर्द येथील नवदुर्गा मित्र मंडळाचे १५ ते २० सदस्य ९ ऑक्टोबर रोजी सप्तशृंगी गडावर देवीची ज्योत आणण्यासाठी गेले होते. देवीची ज्योत घेऊन पायी परत येत असताना सौंदाणे फाट्याजवळ काळ्या रंगाच्या वाहनाने आनंद पाटील यांना जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आनंद पाटील यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि आई-वडील असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार हरपल्याने भोरस खुर्दसह संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या