Wednesday, November 4, 2026
Homeजळगावनवरात्रोत्सवात मंडळाचा अनोखा उपक्रम ; रहस्यमय वातावरणामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये उत्सुकता

नवरात्रोत्सवात मंडळाचा अनोखा उपक्रम ; रहस्यमय वातावरणामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये उत्सुकता

वरणगावात ‘भूत गल्ली’ची चर्चा ; भूत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी !

नवरात्रोत्सवात मंडळाचा अनोखा उपक्रम ; रहस्यमय वातावरणामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये उत्सुकता

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             वरणगाव, ता. भुसावळ :
नवरात्रोत्सवाच्या उत्साहात वरणगाव शहरात
सार्वजनीक महात्मा फुले दुर्गा पुजा मंडळ सावता मंदीर वार्ड ची आई माऊली,माळी वाडा
मंडळाने अनोखा उपक्रम राबवित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शहरातील ‘भूत गल्ली’ची सध्या सर्वत्र चर्चा रंगत असून, या गल्लीत भूत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. रहस्यमय वातावरण आणि भुतांच्या देखाव्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

नवरात्रोत्सवात विविध मंडळांकडून आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, वरणगावातील या मंडळाने ‘भूत गल्ली’च्या माध्यमातून काहीतरी वेगळे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. या अनोख्या संकल्पनेमुळे परिसरात उत्सवाची रंगत वाढली असून, नागरिकही हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.
भीती आणि कुतूहल यांचा अनोखा अनुभव देणारी ही ‘भूत गल्ली’ सध्या नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने राबविलेल्या या उपक्रमामुळे उत्सवात वेगळेपणा निर्माण झाला असून, शहरातील नागरिकांकडूनही या देखाव्याची दखल घेतली जात आहे.
भक्तीमय वातावरणासोबत मनोरंजनाची जोड देणाऱ्या या अनोख्या उपक्रमामुळे वरणगावच्या नवरात्रोत्सवात ‘भूत गल्ली’ आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या