Tuesday, November 3, 2026
Homeगुन्हावरणगावात तीन जणांवर वीजचोरीचा गुन्हा; महावितरणची कारवाई!

वरणगावात तीन जणांवर वीजचोरीचा गुन्हा; महावितरणची कारवाई!

वरणगावात तीन जणांवर वीजचोरीचा गुन्हा; महावितरणची कारवाई!
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                  सिद्धेश्वर नगरात ३०५ युनिट वीजचोरीचा आरोप; प्रत्येकी दोन हजारांची तडजोड रक्कम भरूनही पोलिसांत गुन्हा दाखल
वरणगाव, ता. १७ : वीजचोरीविरोधात महावितरणने कारवाईचा बडगा उगारला असून, वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगर परिसरात तीन वीजग्राहकांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे ३०५ युनिट वीजचोरी केल्याचा आरोप असून, तिघांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये तडजोड रक्कम आकारण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तिघांविरुद्ध महावितरणची कारवाई
महावितरणच्या वरणगाव ग्रामीण-२ कक्षाच्या सहाय्यक अभियंता आरती धीरेंद्र देशमुख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २३ जुलै २०२६ रोजी दुपारी २ ते ४ वाजेदरम्यान सिद्धेश्वर नगर परिसरात वीजचोरी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. गौतम बालचंद्र तायडे, मिलिंद बळिराम मोरे आणि गौतम लक्ष्मण मोरे अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
वीजचोरीच्या युनिटमध्ये नोंदींची तफावत
महावितरणच्या नोंदीनुसार, गौतम बालचंद्र तायडे यांच्याकडे १२२ युनिट वीजचोरी झाल्याचा आरोप असून, त्याची रक्कम १ हजार ५६० रुपये नमूद आहे. मिलिंद बळिराम मोरे यांच्याकडे ९० युनिट वीजचोरीची नोंद असून, रक्कम २ हजार ३४० रुपये आहे. तर गौतम लक्ष्मण मोरे यांच्याबाबत एका नोंदीत ९२ ते ९३ युनिट वीजचोरीचा उल्लेख असून, त्याची रक्कम १ हजार १७० रुपये नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण वीजचोरीच्या युनिटबाबत नोंदींमध्ये तफावत दिसून येत आहे.
तडजोड रक्कम भरली, तरी गुन्हा दाखल
या तिन्ही ग्राहकांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये तडजोड रक्कम आकारण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, तडजोड रक्कम भरल्यानंतरही महावितरणने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार तिघांविरुद्ध विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख करीत आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे सिद्धेश्वर नगर परिसरातील वीजचोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या