Sunday, October 18, 2026
Homeजळगावनवरात्रोत्सव व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात पोलीस दलाचा भव्य रूट...

नवरात्रोत्सव व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात पोलीस दलाचा भव्य रूट मार्च

नवरात्रोत्सव व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात पोलीस दलाचा भव्य रूट मार्च

 

रावेर तालुका प्रतिनिधी खानदेश लाईव्ह न्युज

रावेर शहरात होणाऱ्या आगामी नवरात्रोत्सव व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात शांतता, सुव्यवस्था व सुरक्षिततेचे वातावरण राहावे तसेच नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने रावेर येथे आज, दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता रावेर शहरात पोलीस प्रशासनातर्फे भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.

या रूट मार्चमध्ये रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह रावेर पोलीस स्टेशनचे दुय्यम अधिकारी सपोनि हरिदास बोचरे, सपोनि अमोल बच्छाव, पोउपनि मनोज महाजन, पोउपनि सखाराम कांबळे,

मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त व संख्याबळः रूट मार्चदरम्यान शहरात शिस्तबद्ध व कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये खालीलप्रमाणे विविध पोलीस ठाणे व दलांचे अंमलदार हजर होते.

 

रावेर येथे आज दिनांक 18/10/2026 रोजी नवरात्रोत्सव व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सदर रूट मार्च साठी खालीलप्रमाणे पोलीस अधिकारी , एस.आर.पी.एफ. व होमगार्ड रावेर युनिट हजर होते:
• रावेर पोलीस स्टेशन: 04 दुय्यम अधिकारी व 23 पोलीस अंमलदार
• एस.आर.पी.एफ. (SRPF), अमरावती: 01 अधिकारी व 25 पोलीस अंमलदार रावेर होमगार्ड युनिट: 64 पुरुष होमगार्ड व 05 महिला होमगार्ड रुट मार्चकामी उपस्थित होते.
रावेर शहरातील प्रमुख विसर्जन मार्ग, चौक व संवेदनशील भागांतून फिरून हा रूट मार्च सायंकाळी 6:00 वाजता शांततेत समाप्त झाला.

नवरात्रोत्सव व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी उत्साहात, शांततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरा करावा; कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व कायदा-सुव्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे या प्रसंगी करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या