यावलमध्ये निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी सर्वेक्षण सुरू.पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१८
यावलमध्ये निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी सर्वेक्षण सुरू झाले.सर्वेक्षण करताना किंवा सर्वेक्षणाच्या नावाखाली इतर पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहण्याचे नगराध्यक्षां सौ. छायाताई पाटील यांनी आवाहन केले आहे.
श्रीराम नगर,इस्लामपूरा,सईद पुरा,पंचशील नगर बोरावल गेट परिसरात अतिक्रमणधारकांना टोकन वाटप करण्यात आले असून इतरत्र अतिक्रमण भागात सुद्धा काही दिवसात आवश्यक कागदपत्रे व योजनेबाबत नागरिकांना मार्गदर्शन सुरू आहे.
यावल शहरात शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून श्रीराम नगर, पंचशील नगर, इस्लामपूरा, सईद पुरा,बोरावल गेट परिसरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.व इतरत्र अतिक्रमण भागात सुद्धा लवकरच शासनाच्या नियमानुसार निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबतच्या प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे संबंधित परिसरातील पात्र नागरिकांना आपल्या निवासी अतिक्रमणासंदर्भातील माहिती संकलित करण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.
या सर्वेक्षणांतर्गत यावल शहरातील श्रीराम नगर,पंचशील नगर,सईदपुरा,बोरावल गेट परिसरातील निवासी व इतर ठिकाणी ल अतिक्रमणधारकांची माहिती संकलित करण्यात येत आहे.तसेच शासकीय जागांवरील अतिक्रमण संबंधितांकडून आवश्यक माहिती घेऊन नियमितीकरणाच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
नगरपरिषदेच्या माध्यमातून नेमून दिलेली एजन्सी तर्फे सर्वेक्षण
यावल नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या प्रक्रियेत संबंधित शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणांची माहिती संकलित करणे,नागरिकांच्या नोंदी तयार करणे आणि उपलब्ध कागदपत्रांची माहिती घेणे यावर भर दिला जात आहे.श्रीराम नगर,पंचशील नगर,सईद पुरा, बोरावल गेट परिसरातील व इतर अतिक्रमण धारक नागरिकांनी या सर्वेक्षणात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
पात्र अतिक्रमणधारकांची माहिती संकलित करण्यावर भर
शहरातील विविध भागांत शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून संबंधित नोंदी तयार करणे हा या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे.अतिक्रमण नियमितीकरणाच्या प्रक्रियेत शासनाच्या नियमांनुसार पात्रता तपासली जाणार असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित माहिती उपलब्ध असणे गरजेचे आहे.
अंतिम निर्णय पात्रतेनुसार
शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी लागू असलेल्या शासन निर्णयानुसार संबंधित प्रकरणांची तपासणी केली जाणार आहे.केवळ सर्वेक्षणात नोंद झाल्याने अतिक्रमण नियमित होत नसून,पात्रतेच्या अटींची पूर्तता आणि संबंधित प्रशासनाकडून आवश्यक तपासणी झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
श्रीराम नगर,पंचशील नगर,सईद पुरा,बोरावल गेट व इतर अतिक्रमण धारक परिसरात सुरू असलेल्या या सर्वेक्षणामुळे संबंधित नागरिकांना नियमितीकरणाच्या प्रक्रियेबाबत माहिती मिळण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी सर्वेक्षणादरम्यान अचूक माहिती द्यावी,आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत आणि संबंधित प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच नगरपालिकेने नेमून दिलेली एजन्सी मार्फतच अतिक्रमणधारकांनी फॉर्म भरायचे आहे.कुठल्याही व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास नगरपालिकेच्या संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सौ. छायाताई अतुल पाटील नगराध्यक्षा यांनी केले आहे.

