Sunday, October 18, 2026
Homeजळगावजागतिक हात धुणे दिनानिमित्त आणि माझे गाव आरोग्य संपन्न होण्यासाठी मोरव्हाल येथे...

जागतिक हात धुणे दिनानिमित्त आणि माझे गाव आरोग्य संपन्न होण्यासाठी मोरव्हाल येथे स्वच्छतेचा संदेश.

जागतिक हात धुणे दिनानिमित्त आणि माझे गाव आरोग्य संपन्न होण्यासाठी मोरव्हाल येथे स्वच्छतेचा संदेश.

यावल       खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी    दि.१८
जागतिक हात धुणे दिनानिमित्त रावेर तालुक्यातील मोरव्हाल येथे
हात धुणे ही केवळ स्वच्छतेची सवय नसून निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल आहे.आयुष्यमान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मोरव्हाल यांच्या वतीने अति दुर्गभागात मोरव्हाल येथे जिल्हा परीषद मुला मुलीची शाळा येथे माझे गांव आरोग्य संपन्न गांव व्हावे या साठी जागतीक हात धुणे दिवस योगेश रजनी वाल्मीक कापडणे आरोग्यसेवक मोरव्हाल यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत
साजरा केला.
रावेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अमोल भंगाळे व लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती भामरे मॅडम डॉ.रिजवान शेख सर आरोग्य सहाय्यक महेमुद तडवी, ङि के नमायते आरोग्य निरिक्षक समुदाय वैद्यकीय अधिकारी चेतन चिमणकर यांच्या सूचनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात आरोग्य सेवक योगेश रजनी वाल्मीक कापडणे यांनी यावर्षीची थीम Be a Handwashing Hero!” — “हात धुण्याचा हिरो बना!” याने सुरुवात केली
जागतिक हात धुणे दिनानिमित्त आरोग्य सेवक योगेश कापडणे यांनी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती संदेश दिला वैयक्तिक स्वच्छता राखणे, योग्य पद्धतीने हात धुणे आणि संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करणे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर द्या.
साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुण्याची सवय लावल्यास अतिसार, श्वसनमार्गाचे संसर्ग आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते. विशेषतः जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर, अन्न तयार करण्यापूर्वी, खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.हात धुण्याची योग्य पद्धत हात स्वच्छ पाण्याने ओले करून साबण लावावा. दोन्ही तळहात,हातांची पाठ, बोटांमधील जागा,अंगठे, नखांभोवतीचा भाग आणि मनगट व्यवस्थित घासावे. किमान २० सेकंद हात चोळून स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि स्वच्छ कापडाने किंवा योग्य पद्धतीने हात कोरडे करावेत.
लहान मुलांमध्ये लहानपणापासून हात धुण्याची सवय निर्माण करणे,शाळा व अंगणवाडीमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजवणे आणि प्रत्येक घरात साबण व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.हात धुणे ही केवळ स्वच्छतेची सवय नसून निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल आहे संदेश दिला.

पोस्टर द्वारे जनजागृती करताना आरोग्य विभाग व शिक्षण विभागाच्या वतीने घोषणा देण्यात आल्या
“साबणाने हात धुवा, आजारांना दूर ठेवा स्वच्छ हातांचा संकल्प करूया, निरोगी समाज घडवूया!
यानंतर आशा सेवीका शबाना तडवी, अलीशान तडवी यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक (सुमन) करून दाखवले.व विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मोरव्हाल जिल्हा परीषद शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक योगेश कापडणे आरोग्य सेविका बी. एफ.राठोड आशा सेवीका नजमा तडवी,शबाना तडवी,अलीशान तडवी आदीनी प्रयत्न केले.
कार्यक्रम संपल्यानंतर गावात गृह भेटी,कंटेनर सर्वे,तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने संकलन करण्यात आले गावात आरोग्य विभागाच्या वतीने पोस्टरद्वारे माहिती संदेश देण्यात आले हात धुणे ही केवळ स्वच्छतेची सवय नसून निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या