Sunday, October 18, 2026
Homeजळगावभुसावळात माँ करणी मातेचा ६३९ वा जन्मोत्सव उत्साहात; जय कपिलेश्वर नवदुर्गा मंडळात...

भुसावळात माँ करणी मातेचा ६३९ वा जन्मोत्सव उत्साहात; जय कपिलेश्वर नवदुर्गा मंडळात महाआरती संपन्न

भुसावळात माँ करणी मातेचा ६३९ वा जन्मोत्सव उत्साहात; जय कपिलेश्वर नवदुर्गा मंडळात महाआरती संपन्न

प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते आरती; राजपूत करणी सेनेच्या धार्मिक उपक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

भुसावळ खान्देश लाईव्ह प्रतिनिधी – माँ करणी मातेच्या ६३९ व्या जन्मोत्सवानिमित्त श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने भुसावळ येथील जय कपिलेश्वर नवदुर्गा मंडळात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते विधिवत महाआरती करण्यात आली. माँ करणी मातेच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात हा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला.

जन्मोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात समाजबांधव, महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. माँ करणी मातेच्या चरणी नतमस्तक होत समाजातील एकता, बंधुभाव, सुख-समृद्धी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली.

महाआरतीचा पवित्र मान मिळाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी भुसावळ टीमचे दामोदर भाऊ राजपूत, संदीपसिंह राणा आणि सारिका ताई यांचे आभार मानले. धार्मिक परंपरांचे जतन करण्यासोबतच समाजात एकोपा, आपुलकी आणि बंधुभाव वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मान्यवरांसह समाजबांधवांची उपस्थिती

या सोहळ्याला मुक्ताईनगर येथील विलाससिंह पाटील, भगवानसिंह खंडाळकर, राजेंद्रसिंह राजपूत, दिलीपसिंह राजपूत, दिलीपसिंह पाटील, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलसिंह मोरे, वरणगाव येथील प्रवीणसिंह पाटील, वीरेंद्र राजपूत, आनंदा पाटील, प्रदीप पाटील, राकेश तळेले, नितीन पाटील, गोपाल चौधरी, अतुल वायकोळे, हितेश भोळे, कनक पाटील, बालचंद कनोजिया, पवन तेली, मुरली लोखंडे, बबन नावडे, वैभव भारंबे, रोशनसिंह राजपूत, आशिष राजपूत, अजय जाधव, अभिजित राजपूत, सुनीलसिंह राजपूत, संजय निळे, अक्षय कचवे, प्रवीण वळस्कर, विजय झोपे, दीपक पाटील, भूषण पाटील, भरत पाटील, गणेश पाटील आणि राजू माळी यांच्यासह विविध मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.

महिला वर्गातून राजश्री पाटील, रुपाली चौधरी, हर्षाली पाटील, दीपाली तेली, मीना राजपूत, जयश्री राजपूत, संगीता पाटील, अर्चना पाटील, श्रद्धा पाटील, अक्का पाटील, सविता पाटील, स्मिता पाटील, सुनीता कनोजिया, चैताली झोपे, रंजना पाटील, सोनाली बनसोडे, नीलिमा तळेले, मोहिनी वायकोळे, शीतल भोळे, शीतल कांडेलकर, रीता निळे, योगिता भारंबे, आशा नावडे, शोभा लोखंडे आणि संगीता अटवाल यांच्यासह माता-भगिनींची उपस्थिती होती.

सामाजिक एकतेचा संदेश

धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील एकोपा, परस्पर सहकार्य आणि बंधुभाव अधिक दृढ होतो. संस्कृती व परंपरांचे जतन करत समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सामाजिक ऐक्य टिकवावे, असा संदेश या मंगलमय सोहळ्यातून देण्यात आला. माँ करणी मातेच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित महाआरतीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या