Monday, October 19, 2026
Homeकृषीविल्हाळे येथे शेतकरी दिना निमित मार्गदर्शन

विल्हाळे येथे शेतकरी दिना निमित मार्गदर्शन

विल्हाळे येथे शेतकरी दिना निमित मार्गदर्शन

भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
प्रकल्प संचालक (आत्मा) जळगाव व मा. तालुका कृषि अधिकारी कार्यालय भुसावळ यांचे संयुक्त विद्यमाने आज दि. 15 अॉक्टोबर रोजी ग्रामपंचायत हॉल विल्हाळे येथे जागतिक महिला वर्षाचे औचित्य साधून महिला शेतकरी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विल्हाळे गावाच्या महिला सरपंच सौ. शारदा लक्ष्मण कोल्हे अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. कृषि विज्ञान केंद्र पाल च्या शास्त्रज्ञ श्रीमती भाग्यश्री चौधरी यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना आपण शेतीची कठीण कामे करीत असल्याने महिलांच्या शरीरात नेहमी कॅल्शियम, प्रथिने व शरिराला आवश्यक अशी जीवनसत्त्वाची कमतरता भासून शरिर थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो, चिडचिड होते, अकाली वार्धक्य येते. त्यामुळे महिलांनी आपल्या आहाराकडे लक्ष दिले गेले पाहिजे असे मार्गदर्शन केले. डॉ. राकेश कापगते यांनी पशूधनाचे शेतीत अनन्यसाधारण महत्वाचे स्थान असून त्याचा पोषक आहार व पशूविमा याविषयीवर मार्गदर्शन केले.
तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या श्रीमती संगीता पाटील यांनी महिलांसाठी उद्योग व्यवसाय व महिला सक्षमीकरण याविषयी तर आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांनी रब्बी हंगाम कमी पाण्यातील पिक नियोजन व पिक प्रात्यक्षिकांविषयी माहिती सांगितली. यावेळी महिला शेतकरी गटाचे ५८ महिला उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या