Thursday, October 22, 2026
Homeजळगावमातृशक्ती व स्त्री शक्तीच्या सन्मानाचे उदाहरण म्हणजे नवरात्री उत्सव - महामंडलेश्वर जनार्दन...

मातृशक्ती व स्त्री शक्तीच्या सन्मानाचे उदाहरण म्हणजे नवरात्री उत्सव – महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

मातृशक्ती व स्त्री शक्तीच्या सन्मानाचे उदाहरण म्हणजे नवरात्री उत्सव – महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
नवरात्र उत्सवात अष्टमी व नवमीला भगवती स्वरूप कुमारीका कन्यांचे पूजन करून त्यांना पोटभर भोजन व नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा असेआवाहन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. भारतीय आर्य हिंदू सनातन संस्कृतीमध्ये कन्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे. कन्या पूजनाचे महत्त्व नवरात्रीनिमित्त सीमित नसून वर्षभर शुभ कार्य करतेवेळी कुवारिका कन्या पूजनाने ते

 

करावे, तिचा सन्मान करावा, प्रणाम करावा असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. वढोदा येथील निष्कलंक धाम तुलसी हेल्थ केअर सेंटर मध्ये परिसरातील सर्व जाती-धर्माच्या सुमारे ६०० कुवारीका कन्यांचे पूजन करून त्यांना पोटभर स्वादिष्ट भोजन देण्यात आले. भोजनानंतर प्रत्येक कन्येला स्कूल बॅग, शालेय साहित्य, चुनरी व शृंगार, अशा विविध वस्तू व प्रत्येकी दक्षिणा म्हणून रोख रक्कम देण्यात आली. यावेळी प्रत्येक कन्येच्या चेहऱ्यावरील आनंद माता पितांसह सर्वांनी अनुभवला.

 


नवरात्रीत ज्या जगदंबेची आपण उपासना करतो, त्या शक्तीची, त्या मातेची छबी आपल्या प्रत्येक माता-भगिनींमध्ये आपल्याला दिसली पाहिजे. सध्या पुरेशी पर्जन्यदृष्टी न झाल्याने भविष्यात मोठे संकट येऊ शकते शेतकरी राजा चिंतेत आहे तसेच येणारे संकट दूर होण्यासाठी व आलेल्या संकटाचा सामना करण्याची शक्ती आपण सर्वांना प्राप्त होण्यासाठी कुमारीका कन्यांचा आशीर्वाद आपण सर्वांनी घ्यावा असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. वढोदा येथील श्री निष्कलंक धाम मध्ये सुमारे ६०० कुवारीका कन्या पूजनासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी बल्लूभाई पटेल, संजय मुरलीधर चौधरी, भावेश चौधरी, मुख्या. पी. आर.महाजन सर यांचे विशेष सहकार्य लाभले. तर तुलसी हेल्थ सेंटर येथे सेवा देणारे अरुण महाजन सर, प्रमोद भिरूड, पी. पी. ठोंबरे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, भाविक यांनी कन्या पूजन करून सर्वांनी आशीर्वाद घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या