Friday, October 23, 2026
Homeगुन्हामित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तिघांवर चाकूहल्ला ; गुन्हा दाखल!

मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तिघांवर चाकूहल्ला ; गुन्हा दाखल!

मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तिघांवर चाकूहल्ला ; गुन्हा दाखल!

 

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जळगाव शहरातील वाघनगर परिसरात मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणांवर धारदार चाकूने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. वाघनगरातील दत्त मंदिराजवळ घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजीव गांधी नगरात राहणारा निखील लक्ष्मण हातागळे (वय २४) हा त्याचे मित्र तेजस लोंढे आणि गिरीश लोंढे यांच्यासोबत वाघनगर परिसरात मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेला होता. यावेळी संशयितांनी त्यांना शिवीगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली.दरम्यान, रोहित नाथ याने तेजस लोंढे यांच्या मांडीत चाकू खुपसल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच शुभम ठाकूर याने पुन्हा गल्लीत दिसल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

जखमींनी दिलेल्या तक्रारीवरून शुभम उर्फ पेट्या ठाकूर, रोहित नाथ आणि पियुष इंगळे (तिघेही रा. वाघनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश देवरे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या