Friday, October 23, 2026
Homeजळगावभुसावळात संविधान बचाव समितीचा तिरंगा जनआक्रोश मोर्चा; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळात संविधान बचाव समितीचा तिरंगा जनआक्रोश मोर्चा; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळात संविधान बचाव समितीचा तिरंगा जनआक्रोश मोर्चा; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
संविधान बचाव समिती, भुसावळ यांच्या वतीने गुरुवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी शहरात तिरंगा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाच्या माध्यमातून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, एसआयआर प्रक्रिया रद्द करणे तसेच ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रपती महोदयांना उद्देशून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे जनतेच्या मनात अविश्वास निर्माण होत असल्याचा दावा करत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी समितीने केली.
तसेच एसआयआर प्रक्रियेमुळे मतदारांच्या हक्कांबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे नमूद करून ही प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत जनतेच्या मनातील संशय दूर करण्यासाठी आगामी निवडणुका बॅलेट पेपर पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी भूमिकाही निवेदनातून मांडण्यात आली.
भारतीय संविधानाने दिलेले लोकशाही अधिकार सुरक्षित ठेवणे आणि निवडणूक यंत्रणेवरील जनतेचा विश्वास कायम राखणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे. या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती राष्ट्रपतींकडे करण्यात आली.
यावेळी संविधान बचाव समितीचे अहमद इब्राहिम कुरैशी, अनुप खोबरागडे, रेहान जलील कुरैशी, सुधीर जंजाळे, जुनेद अशरफ खान, नमा शर्मा, शेख मुजाहिद, गणेश चौधरी (सोनावने), हाजी सलीम पिंजारी, रविंद्र निकम, अकबर अहमद शेख, प्रवीण सुरवाडे, शाकिर पिंजारी, गणेश सपकाळे, जावेद हामिद शेख, विजय साळवे, साजिद सलीम बागवान, मुन्ना सोनावने, शेख रऊफ युसूफ आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या