Friday, October 23, 2026
Homeजळगावयावल राजकीय वर्तुळात मोठी खळबळ नगरसेवक शेख निसार हमीद अपात्र . जळगाव...

यावल राजकीय वर्तुळात मोठी खळबळ नगरसेवक शेख निसार हमीद अपात्र . जळगाव जिल्हाधिकारी यांचा धडक निर्णय.

यावल राजकीय वर्तुळात मोठी खळबळ नगरसेवक शेख निसार हमीद अपात्र .
जळगाव जिल्हाधिकारी यांचा धडक निर्णय.

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     दि.२३
यावल नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे.प्रभाग क्रमांक पाच मधील नगरसेवक शेख निसार हमीद यांना नगरसेवक पदावरून अपात्र घोषित करण्यात आले असून त्यांची जागा रिक्त घोषित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जळगाव यांच्या न्यायालयातील आदेशानुसार ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय?
यावल येथील रहिवासी स्वीकृत नगरसेवक उमेश रेवा फेगडे यांनी ‘महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५’ मधील कलम १६ (१) (के) अन्वये शेख निसार हमीद यांच्याविरोधात अनर्हता अर्ज दाखल केला होता. प्रभाग क्रमांक ५-अ मधील नगरसेवक शेख निसार हमीद यांनी पदावर राहण्यासाठीच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप या अर्जात करण्यात आला होता.
निकालाचा मुख्य आधार
या प्रकरणात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची तपासणी केल्यानंतर महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.
जन्म नोंद व शैक्षणिक दाखले: यावल नगरपरिषदेतील जन्मनोंद क्र. ३०७ ( दिनांक १८/०६/२००३) मधील माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या रकान्यातील नाव व स्वाक्षरी, तसेच शैक्षणिक अभिलेखांमधील जन्म तारीख (०६/०६/२००३) यांचा मुख्य आधार घेऊन हा निर्णय देण्यात आला आहे.
जळगाव जिल्हाधिकारी यांचा धडक आदेश
जिल्हाधिकारी आदेशानुसार
१. अर्जदार उमेश रेवा फेगडे यांचा अनर्हता अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
२. नगरसेवक शेख निसार हमीद यांना अपात्र घोषित करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे आणि ती जागा रिक्त घोषित करण्यात आली आहे.
३. सह आयुक्त नगरपालिका प्रशासन (जनार्दन पवार) यांनी या आदेशाची प्रत मुख्य अधिकारी (नगरपरिषद यावल) व निवडणूक प्राधिकरणास पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे यावल शहरातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येइल
अशी भाजप गटात चर्चा असून, या निर्णयाचे स्थानिक वर्तुळात मोठे पडसाद उमटत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या