Tuesday, October 27, 2026
Homeजळगाववराडसिम येथील बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी सुटले

वराडसिम येथील बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी सुटले

वराडसिम येथील बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी सुटले

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     सुनसगाव      ता भुसावळ  – येथून जवळच असलेल्या वराडसिम येथील ग्रामस्थांनी विकास कामे होत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालया समोर दि.१९ ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत ग्रामपंचायत कार्यालयाने विविध प्रकारच्या कामांना सुरुवात केली होती. दि.२३ रोजी पाचव्या दिवशी भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ कुलदीप ठाकरे , विस्तार अधिकारी गौतम वाढे , ग्रामविकास अधिकारी संजय भारंबे, एस डी पाटील यांनी या उपोषण स्थळी भेट देऊन सर्व मागण्या येत्या तीन महिन्यांत पूर्ण केल्या जातील असे लेखी आश्वासन दिले त्यामुळे उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते अक्षय संतोष सपकाळे व सहकाऱ्यांनी उपोषण सोडले यावेळी सरपंच सौ निलप्रभा पाचपांडे , ग्रामविकास अधिकारी राहुल तायडे व ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या