जुन्या वादातून आसोद्यात राडा; पिता-पुत्रासह मेहुण्याला मारहाण!
तरुणावर कुऱ्हाडीने वार; चौघांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील आसोदा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादात रामचंद्र प्रल्हाद कोळी (वय ५८), त्यांचा मुलगा योगेश कोळी आणि मेहुणे कैलास सुखा कोळी यांना चौघांनी मारहाण केल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेत योगेश कोळी याच्यावर कुऱ्हाडीने वार करून दुखापत करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आसोदा येथे जुन्या भांडणातून पुन्हा वाद निर्माण झाला. यावेळी रामचंद्र कोळी आणि त्यांचा मुलगा योगेश यांना मारहाण करण्यात आली. वादादरम्यान योगेश याच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला. हा प्रकार सुरू असताना रामचंद्र कोळी यांचे मेहुणे कैलास सुखा कोळी हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.या प्रकरणी रामचंद्र कोळी यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अशोक लालचंद कोळी, दुर्गादास अशोक कोळी, विलास बाळू कोळी आणि विकास बाळू कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार सुनील पाटील करीत आहेत.

