राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे महर्षी वाल्मीक जयंती
> मधील टू व्हिलर रॅलीवर पुष्पवृष्टी
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने महर्षी वाल्मीक जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरात काढण्यात आलेल्या भव्य टू व्हिलर रॅलीचे करणी सेनेच्या वतीने ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.याप्रसंगी जयंती समितीच्या वतीने करणी सेनेच्या टीमचा महर्षी वाल्मीकी यांची सप्रेम प्रतिमा देऊन विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार जयंती समिती अध्यक्ष आकाश सपकाळे, उपाध्यक्ष भास्कर डोडे, स्वराज्य कोळी समाज संघटनेचे विजय मोरे आणि माजी समिती प्रमुख लक्ष्मण कोळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याला करणी सेनेचे राज्याचे कार्याध्यक्ष दामोदर राजपूत, प्रदेश सचिव आनंदा पाटील, जळगाव जिल्हा अध्यक्ष संदीप राणा, महिला जिल्हा अध्यक्ष सारिकाताई राजपूत, भुसावळ तालुका अध्यक्ष (ग्रामीण) नितीन पाटील, भुसावळ अध्यक्ष प्रदीप पाटील, महिला तालुका अध्यक्ष जयश्रीताई पाटील, जिल्हा सचिव कविता राजपूत, महिला शहर अध्यक्ष प्रतीक्षा राजपूत, कार्यकारी अध्यक्ष सुरेश पाटील, श्रध्दा राजपूत तसेच गणेश पाटील व वीरेंद्र राजपूत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.महर्षी वाल्मिकी यांनी आपल्या विचारांतून आणि रामायणाच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेला धर्म, त्याग, कर्तव्य, सत्य, ज्ञान आणि संस्कारांचा अमूल्य संदेश दिला. त्यांच्या या महान विचारांचा आदर्श घेऊन समाजात एकता, समता आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.महर्षी वाल्मीकी हे संस्कृत साहित्यातील ‘आदिकवी’ मानले जातात. त्यांनी रचलेला महान ग्रंथ ‘रामायण’ हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून मानवी मूल्ये, सत्य, धर्म, कर्तव्य आणि आदर्शांचा अनोखा संदेश देणारा जीवनग्रंथ आहे. एका साध्या जीवनातून कठोर तपश्चर्येच्या बळावर ब्रह्मर्षी पद प्राप्त करणाऱ्या महर्षी वाल्मीकी यांचे जीवन म्हणजे परिवर्तन आणि आत्मज्ञानाचे श्रेष्ठ उदाहरण आहे. त्यांचे विचार आणि शिकवण आजही समाजाला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी महर्षी वाल्मीकी यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि समाजात बंधुभाव व एकता जपण्याचा संकल्प केला.शहरात विविध ठिकाणी देखील महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

