Tuesday, October 27, 2026
Homeजळगावभुसावळात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आदिवासी कोळी बांधवांची भव्य मोटार सायकल रॅली संपन्न...

भुसावळात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आदिवासी कोळी बांधवांची भव्य मोटार सायकल रॅली संपन्न • विविध ठिकाणी पुष्पवर्षाव करून रॅलीचे स्वागत • सांस्कृतिक वारसाचे दर्शन आणि महापुरुषांना अभिवादन भुसावळ प्रतिनिधी येथील आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती २०२६ च्या वतीने सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी भुसावळ शहरात भव्य मोटार सायकल रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या या भव्य रॅलीमध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर रॅलीची सुरुवात शहरातील प्रसिद्ध साई मंदिरापासून झाली. कोळी मंगल कार्यालय (जुना सातारा) असा या रॅलीचा मार्ग होता. रॅलीच्या मार्गात लागणाऱ्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना व पुतळ्यांना समिती व समाज बांधवांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. एक आदर्श आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली काढण्यात आली होती. बाजारपेठ पोलीस स्टेशन जवळ मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाध्यक्ष संतोष शेलोडे , शहराध्यक्ष कमलेश चौधरी , मनोहर लोणे, विनोद गोरधे, सुनील आराक , आकाश ढाके यांनी पुष्पवर्षाव करून स्वागत केले . विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुष्पवर्षाव शहरातून मार्गस्थ होत असताना या आदर्श रॅलीचे जागोजागी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी संपूर्ण रॅलीवर पुष्पवर्षाव करून स्वागत केले. या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समितीच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा, व श्रीफळ भेट देऊन आभार मानण्यात आले. या रॅलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात आदिवासी कोळी जमातीच्या समृद्ध संस्कृतीची आणि परंपरेची सुंदर प्रतिछाया (झलक) देखील सादर करण्यात आली होती, जी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शांततेत उत्सव साजरे करण्याचे आवाहन साई मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली कोळी मंगल कार्यालयात पोहोचल्यानंतर तिथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व आगामी जयंती उत्सव आणि कार्यक्रम अत्यंत आनंदात व शांततेच्या वातावरणात पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. या रॅलीमध्ये भुसावळ शहरातील अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आणि नेत्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती ही रॅली यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश सपकाळे, उपाध्यक्ष भास्कर दोडे, चंदन तायडे, सचिव सुरेश कोळी, सहसचिव दुर्गेश कोळी, कार्याध्यक्ष पवन मोरे, खजिनदार गणेश कोळी, योगेश कोळी, विजय कोळी, तसेच मार्गदर्शक नारायण कोळी, जितेंद्र सपकाळे सर, लक्ष्मण सपकाळे, विजय मोरे, मोहन सोनावणे , नारायण कोळी यांच्यासह समितीचे इतर पदाधिकारी, यांच्या नेतृत्वात, रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते तरी याठिकाणी विविध सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी कोळी जमातीचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुसावळात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आदिवासी कोळी बांधवांची भव्य मोटार सायकल रॅली संपन्न

• विविध ठिकाणी पुष्पवर्षाव करून रॅलीचे स्वागत
• सांस्कृतिक वारसाचे दर्शन आणि महापुरुषांना अभिवादन

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती २०२६ च्या वतीने सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी भुसावळ शहरात भव्य मोटार सायकल रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या या भव्य रॅलीमध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सदर रॅलीची सुरुवात शहरातील प्रसिद्ध साई मंदिरापासून झाली.


कोळी मंगल कार्यालय (जुना सातारा) असा या रॅलीचा मार्ग होता. रॅलीच्या मार्गात लागणाऱ्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना व पुतळ्यांना समिती व समाज बांधवांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. एक आदर्श आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली काढण्यात आली होती.
बाजारपेठ पोलीस स्टेशन जवळ मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाध्यक्ष संतोष शेलोडे , शहराध्यक्ष कमलेश चौधरी , मनोहर लोणे, विनोद गोरधे, सुनील आराक , आकाश ढाके यांनी पुष्पवर्षाव करून स्वागत केले .
विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुष्पवर्षाव
शहरातून मार्गस्थ होत असताना या आदर्श रॅलीचे जागोजागी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी संपूर्ण रॅलीवर पुष्पवर्षाव करून स्वागत केले. या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समितीच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा, व श्रीफळ भेट देऊन आभार मानण्यात आले. या रॅलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात आदिवासी कोळी जमातीच्या समृद्ध संस्कृतीची आणि परंपरेची सुंदर प्रतिछाया (झलक) देखील सादर करण्यात आली होती, जी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.


शांततेत उत्सव साजरे करण्याचे आवाहन
साई मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली कोळी मंगल कार्यालयात पोहोचल्यानंतर तिथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व आगामी जयंती उत्सव आणि कार्यक्रम अत्यंत आनंदात व शांततेच्या वातावरणात पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. या रॅलीमध्ये भुसावळ शहरातील अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आणि नेत्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
ही रॅली यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश सपकाळे, उपाध्यक्ष भास्कर दोडे, चंदन तायडे, सचिव सुरेश कोळी, सहसचिव दुर्गेश कोळी, कार्याध्यक्ष पवन मोरे, खजिनदार गणेश कोळी, योगेश कोळी, विजय कोळी, तसेच मार्गदर्शक नारायण कोळी, जितेंद्र सपकाळे सर, लक्ष्मण सपकाळे, विजय मोरे, मोहन सोनावणे , नारायण कोळी यांच्यासह समितीचे इतर पदाधिकारी, यांच्या नेतृत्वात, रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते तरी याठिकाणी विविध सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी कोळी जमातीचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या