विविध ठिकाणी पुष्पवर्षाव करून रॅलीचे स्वागत सांस्कृतिक वारसाचे दर्शन आणि महापुरुषांना अभिवादन
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ येथील आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती २०२६ च्या वतीने सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी भुसावळ शहरात भव्य मोटार सायकल रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या या भव्य रॅलीमध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सदर रॅलीची सुरुवात शहरातील प्रसिद्ध साई मंदिरापासून झाली.
कोळी मंगल कार्यालय (जुना सातारा) असा या रॅलीचा मार्ग होता. रॅलीच्या मार्गात लागणाऱ्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना व पुतळ्यांना समिती व समाज बांधवांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. एक आदर्श आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली काढण्यात आली होती.बाजारपेठ पोलीस स्टेशन जवळ मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाध्यक्ष संतोष शेलोडे , शहराध्यक्ष कमलेश चौधरी , मनोहर लोणे, विनोद गोरधे, सुनील आराक , आकाश ढाके यांनी पुष्पवर्षाव करून स्वागत केले.विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुष्पवर्षाव शहरातून मार्गस्थ होत असताना या आदर्श रॅलीचे जागोजागी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.


