फैजपूर नगरपालिकेत महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात; शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रतिमेचे पूजन

फैजपूर: खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ हा महान विचार देणारे आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचे आदर्श चरित्र रामायणाच्या माध्यमातून कलमबद्ध करून सनातन वैदिक संस्कृतीचे रक्षण करणारे आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती फैजपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. फैजपूर नगरपालिकेमध्ये शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महर्षी वाल्मिकी यांनी आपल्या विचारांतून आणि रामायणाच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेला धर्म, त्याग, कर्तव्य, सत्य, ज्ञान आणि संस्कारांचा अमूल्य संदेश दिला. त्यांच्या या महान विचारांचा आदर्श घेऊन समाजात एकता, समता आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.
या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक पवन सराफ,,चंद्रकांत कोळी , शिवसेना पदाधिकारी व माजी नगरसेवक , मनोज कापडे, माजी नगरसेवक अप्पा चौधरी,, आवेश भांज्या ,ऍड. आकाश चौधरी,नितीन कोळी, कृणाल चौधरी
लोकेश कोल्हे, विजय मिस्त्री,, मृणाल नारखेडे, सनी तेजकर, ,मोहित जावळे ,मोंटू पचरवाल, नीरज झोपे भूषण चौधरी,जलील मोमीन ,किरण भिल,
यांच्यासह अनेक शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपालिकेसोबतच फैजपूर शहरात विविध ठिकाणी देखील महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

