संगोपनासहित देशी वृक्ष लागवडीचा संकल्प करत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी डॉ. सुरेंद्रसिंग पाटील भुसावळ खान्देश ला इंग्लिश प्रतिनिधी दिवाळीचा सण वसुबारस पासून ते भाऊबीजेपर्यंत साजरा केला जातो यंदाची दिवाळी ही सर्व भागात दुष्काळाची परिस्थिती असताना साजरी केली जात आहे. काही कारणास्तव मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून जंगल क्षेत्रात येत असलेली कमी तसेच शेतामध्ये सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात झाडे नाहीत काही शेतामध्ये तर एकही झाड नाही रस्त्यावरील झाडे रुंदीकरणामुळे तोडण्यात येत आहेत एकंदरीत दीर्घकाळ टिकणारी पर्यावरणपूरक देशी झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत देशी झाडांची मुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रमाणे खोलवर जमिनीत पाणी पोहोचवण्याचं काम करत असतात तीच झाडे कमी झाल्याने वॉटर लेवल मोठ्या प्रमाणात खोलवर गेल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे दिवाळीला प्रत्येकाच्या तोंडी दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी हा शब्द असतो दिवाळीची सुरुवात आपण वसुबारस म्हणजेच ज्याप्रमाणे पोळ्याला आपण बैलांची पूजा करतो त्याचप्रमाणे गाई म्हशींची पूजा करून दिवाळीची सुरुवात होते यंदा शेतीसाठीच काय तर आपणांसहित गाई म्हशींना सुद्धा पाणी पिण्यासही नाही गाई म्हशींना पिण्यास पाणी नाही त्यानंतर धनतेरस धन्वंतरी मातेला आपणास निरोगी शरीरासाठी आवश्यक ऑक्सीजन युक्त झाडे नाहीत लक्ष्मीपूजन दुष्काळजन्य परिस्थितीमुळे लक्ष्मी नाही भाऊबीजेला बहिणींना भाच्यांना झोके खेळायला मोठी झाडे नाहीत त्यामुळे मोठ्या प्रमाणात देशी झाडांची लागवड अत्यावश्यक आहे तरी प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये शेतावरील बांधावर मोठ्या प्रमाणावर देशी झाडांची तसेच दीर्घकाळ टिकणारी फळझाडांची लागवड करावी तसेच प्रत्येकाने आपल्या घरासमोर अथवा शाळा, दवाखाने,ओपन स्पेस किंवा इतर ठिकाणी जिथे जागा उपलब्ध असेल तिथे या दिवाळीला इतर खर्च कमी करत संगोपनासहित वृक्षलागवड करण्याचा संकल्प करत साजरी करावी व आपले आदरणीय पंतप्रधान यांच्या ॔॔॔एक पेड माँ के नाम॓॓॓ अभियान 3 मध्ये आपला सहभाग नोंदवावा डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान


