Monday, November 9, 2026
Homeसामाजिकबियाणी ग्रुपमध्ये दिवाळीचा उत्साह; लक्ष्मीपूजन, भेटवस्तू वाटप अन् फटाक्यांची आतषबाजी!

बियाणी ग्रुपमध्ये दिवाळीचा उत्साह; लक्ष्मीपूजन, भेटवस्तू वाटप अन् फटाक्यांची आतषबाजी!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील प्रसिद्ध बियाणी ग्रुपतर्फे दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाचा पवित्र सण रविवारी मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बियाणी परिवाराने पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन व दीपपूजन करून सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली.या शुभप्रसंगी बियाणी ग्रुपचे चेअरमन मनोज बियाणी आणि सचिव डॉ. संगीता बियाणी यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात देवी लक्ष्मीचे पूजन करण्यात आले. तसेच स्मिता बियाणी आणि डॉ. खुशी बियाणी यांनी ग्रुपच्या वाहनांचे पारंपरिक पद्धतीने पूजन केले.

कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित

बियाणी ग्रुपने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली सामाजिक व कौटुंबिक परंपरा जपत समूहातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सदस्यांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. अभियंता रौनक बियाणी आणि डॉ. आयुषी बियाणी यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आकर्षक भेटवस्तूंचे वाटप केले. व्यवस्थापनाकडून मिळालेल्या या प्रेमळ सन्मानामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.

संपूर्ण बियाणी परिवाराची उपस्थिती

या दीपोत्सव सोहळ्याला चेअरमन मनोज बियाणी, डॉ. संगीता बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, अभियंता रौनक बियाणी, डॉ. मुस्कान बियाणी, डॉ. आयुषी बियाणी, अभियंता मनीष बियाणी, डॉ. खुशी बियाणी आणि कांताबाई बियाणी यांच्यासह संपूर्ण बियाणी परिवार उपस्थित होता.यावेळी समूहाचे व्यवस्थापक गोपाल ठाकूर, राजेश पारीक, प्राचार्य डी. एम. पाटील, राजू मोरे, सुनील पिहुल, सुनील महाजन, गुणवंत महाजन, सलीम पठाण, आदित्य तायडे, जितेंद्र वारके, हर्षल धुंडले आणि तेजस अट्रावलकर यांच्यासह समूहातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.लक्ष्मीपूजनानंतर उपस्थितांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रोषणाई, पूजन, भेटवस्तूंचे वाटप आणि आनंदमय वातावरणामुळे बियाणी ग्रुपचा दिवाळी सोहळा उत्साहात पार पडला.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या