Monday, November 16, 2026
Homeजळगावभुसावळात मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न; महिलांना स्वयंरोजगाराची नवी संधी

भुसावळात मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न; महिलांना स्वयंरोजगाराची नवी संधी

भुसावळात मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न; महिलांना स्वयंरोजगाराची नवी संधी

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ नगरपालिका व आस बहुउद्देशीय विकास संस्था, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत शहरातील महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गरुड प्लॉट येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी रजनी सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी अशा प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी महिला व बालकल्याण सभापती शोभा रणधीर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले . तसेच आस बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले होते .
प्रसंगी मीना लोणारी, अर्चना सातदिवे, सीमा नरवाडे, सौ. सोनल महाजन, सौ. सविता मकासरे, सौ. दीपाली बऱ्हाटे, सौ. वैशाली शेतवाल सौं वैशाली मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणामुळे महिलांना ब्युटी पार्लर व्यवसायाचे मूलभूत ज्ञान मिळून स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस बहुउद्देशीय विकास संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या