Tuesday, November 17, 2026
Homeजळगावअमृत टप्पा 2 योजनेच्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी

अमृत टप्पा 2 योजनेच्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी

अमृत टप्पा 2 योजनेच्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी
भुसावळ –    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      येथील अमृत टप्पा 2 योजनेचे ठेकेदार एडके व विलास पाटील असोसिएट यांना ब्लॅकलिस्ट करा, अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, संबंधित ठेकदार यांना सदरील अमृत अप्पा दोन योजनेचे काम 15 ऑक्टोबर 2026 रोजी कार्यकाळ संपला. मात्र अद्याप 50 टक्के काम सुध्दा पूर्ण झाले नाही. दुष्काळी परिस्थिती पाहता ही योजना प्राधान्यक्रमाने पूर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र ही योजना ठेकेदाराच्या आर्थिक स्वार्थासाठी मुद्दाम रखडवली जात आहे. त्यामुळे भुसावळकर जनतेला नाहक वेठीस धरले जात आहे. त्यामुळे सदरील ठेकेदार यांच्याकडून काम काढून घेवून त्यावर नियमाप्रमाणे दंडात्मक तसेच काळ्या यादीत समाविष्ट करण्याची कारवाई करण्यात यावी अशी विनंती निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या