Tuesday, November 17, 2026
Homeजळगावभुसावळ विभागातील आरपीएफची तत्पर कारवाई! एकट्याने प्रवास करणाऱ्या २ बालकांना सुरक्षित करून...

भुसावळ विभागातील आरपीएफची तत्पर कारवाई! एकट्याने प्रवास करणाऱ्या २ बालकांना सुरक्षित करून बाल कल्याण समितीकडे सुपूर्द

भुसावळ विभागातील आरपीएफची तत्पर कारवाई! एकट्याने प्रवास करणाऱ्या २ बालकांना सुरक्षित करून बाल कल्याण समितीकडे सुपूर्द
भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत आरपीएफ भुसावळ येथील जवानांनी सतर्कता, तत्परता आणि माणुसकीचे दर्शन घडवत एकट्याने प्रवास करणाऱ्या २ बालकांना सुरक्षित संरक्षण मिळवून दिले.

दिनांक 14.11.2026 रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 04 येथे गाडी क्रमांक 12843 अप संदर्भात रेल मददच्या माध्यमातून माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे आरक्षक आशीष यादव आणि सहाय्यक उपनिरीक्षक ओ.पी. मीणा यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित रेल्वेगाडीच्या पुढील जनरल डब्याची तपासणी केली.

चौकशीदरम्यान दोन्ही मुलांची ओळख ओम बाबू गोंड (वय 14 वर्षे) आणि शुभंकर राणा (वय 14 वर्षे), दोघेही रा. गंगापूर, जिल्हा गंजाम, ओडिशा अशी पटली. प्राथमिक चौकशीमध्ये समाधानकारक माहिती मिळाली नसल्याने दोन्ही मुलांना सुरक्षितपणे आरपीएफ पोस्ट, भुसावळ येथे आणण्यात आले. याबाबत आधार बहुउद्देशीय संस्थेचे भुसावळ येथील कर्मचारी श्री. सुनील जगन हिवाळे यांना माहिती देण्यात आली.

सहाय्यक उपनिरीक्षक ओ.पी. मीणा यांच्या उपस्थितीत दोन्ही मुलांची चौकशी व समुपदेशन करण्यात आले. यावेळी मुलांनी त्यांच्या पालकांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिले. पालकांशी संपर्क साधला असता, दोन्ही मुले घरातून निघून गेली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुलांना घेण्यासाठी ते भुसावळ येथे येत असल्याची माहिती दिली.

त्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक ओ.पी. मीणा यांनी आवश्यक कागदोपत्री कार्यवाही पूर्ण केली. दोन्ही अल्पवयीन मुलांची ट्रॉमा केअर सेंटर, भुसावळ येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील आवश्यक देखभाल, संरक्षण आणि बाल कल्याण समिती (CWC), जळगाव यांच्यासमोर सादर करण्यासाठी दोन्ही मुलांना आधार बहुउद्देशीय संस्थेचे प्रकल्प समन्वयक श्री. सुनील जगन हिवाळे यांच्या ताब्यात देण्यात आले.

आरपीएफ कर्मचाऱ्यांची सतर्कता, तातडीची कारवाई आणि आधार बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्यामुळे दोन्ही अल्पवयीन मुलांना सुरक्षित संरक्षण मिळाले.

मध्य रेल्वे, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत केलेल्या या मानवतावादी आणि प्रशंसनीय कार्याचे कौतुक करते. मुलांची सुरक्षा, संरक्षण आणि त्यांचे सुरक्षित भविष्य यासाठी आरपीएफ सदैव कटिबद्ध आहे.

मध्य रेल्वे, भुसावळ विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणतेही अल्पवयीन मूल रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वेगाडीत एकटे, निराधार अथवा संशयास्पद परिस्थितीत आढळल्यास त्याची माहिती तात्काळ जवळच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) किंवा लोहमार्ग पोलिसांच्या (GRP) कर्मचाऱ्यांना द्यावी. जेणेकरून संबंधित मुलाला वेळेत आवश्यक मदत, संरक्षण आणि सुरक्षितता प्रदान करता येईल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या