Thursday, November 19, 2026
Homeजळगावसेवाविषयक नियमांची माहिती करून घेणे आवश्यक – किशोर वायकोळे यांचे प्रतिपादन

सेवाविषयक नियमांची माहिती करून घेणे आवश्यक – किशोर वायकोळे यांचे प्रतिपादन

सेवाविषयक नियमांची माहिती करून घेणे आवश्यक – किशोर वायकोळे यांचे प्रतिपादन

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. या बदलांची माहिती शिक्षकांना असणे आवश्यक आहे. या बदलांची माहिती शिक्षकांना होणाऱ्या विविध प्रशिक्षणामधून मिळत असते. वरिष्ठ व निवड प्रशिक्षणातून शिक्षकांनी आपल्या सेवाविषयक नियमांची सखोल माहिती करून घ्यावी, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी केले.

दादासाहेब रामदास गणपत झांबरे माध्यमिक विद्यालय, भुसावळ येथे तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांसाठी निवड वेतन श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणास प्रारंभ झाला. या प्रशिक्षणप्रसंगी मार्गदर्शन करताना किशोर वायकोळे बोलत होते.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शिक्षकांनी बदलत्या अभ्यासक्रमानुसार नियमांचा अभ्यास केला पाहिजे. तसेच शाळा गुणवत्तापूर्ण करण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. शाळेतील विविध समित्यांचे कार्य समजून घेऊन त्यांचा प्रभावीपणे उपयोग शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करावा.

याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, सुनील वानखेडे, विषयतज्ज्ञ सचिन पाटील आदी उपस्थित होते.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना वेतनश्रेणीसंदर्भातील आवश्यक नियम, प्रक्रिया व विविध प्रशासकीय बाबींची सविस्तर माहिती दिली जात आहे.
या प्रशिक्षणासाठी वरिष्ठ वेतन श्रेणीचे मार्गदर्शक शिक्षक म्हणून विजय झोपे, पंकज साखरे, राहुल भारंबे व तेजेंद्र महाजन कार्य पाहत आहेत. तर निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नारायण निळे, घनश्याम पाटील, काशीराम बारेला काम पहात आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या