Monday, November 23, 2026
Homeगुन्हा५० लाख रुपयासाठी विवाहितेचा छळ भुसावळात गुन्हा दाखल

५० लाख रुपयासाठी विवाहितेचा छळ भुसावळात गुन्हा दाखल

५० लाख रुपयासाठी विवाहितेचा छळ भुसावळात गुन्हा दाखल

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

राजस्थानच्या जयपूरमध्ये मोठे हॉस्पीटल बांधण्यासाठी माहेरुन 50 लाख रुपये न आणल्याने भुसावळातील उच्च शिक्षित डॉक्टर विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात डॉ. सौरभ प्रजापतसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. नयना सौरभ प्रजापत वय ३२, हॉटेल सुहासजवळ, गोविंद कॉलनी, अयोध्या नगर, भुसावळ यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, 27 नोव्हेंबर 2023 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान पतीसह अन्य सात आरोपींनी राजस्थानच्या जयपूरमध्ये मोठे हॉस्पीटल बांधण्यासाठी माहेरून 50 लाख रुपये आणावेत म्हणून मानसिक व शारीरीक त्रास देत वेळोवेळी गांजपाठ करीत मारहाण केली व रक्कम आणल्याशिवाय नांदवण्यास नेणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
संशयित आरोपींमध्ये डॉ. सौरभ प्रजापत वय ३१, सासरे प्रभूराम प्रजापत वय ६२, सासू संतोष प्रभूराम प्रजापत वय ५८, जेठ डॉ. नितीन प्रभूराम प्रजापत वय ३३, चुलत सासरे रामजी प्रजापत वय ५६, चुलत सासू कांचन प्रजापत वय ४८, सर्व राहणार हॉटेल सुहासजवळ, गोविंद कॉलनी, भुसावळ, नणंद डॉ. स्वाती प्रजापत वय ३६, उदयपूर, राजस्थान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
अधिक तपास बाजार पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तेजस पारीस्कर करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या