Wednesday, November 25, 2026
Homeआंदोलनकुऱ्हा पानाचे येथे ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन यशस्वी , मागण्या मान्य !

कुऱ्हा पानाचे येथे ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन यशस्वी , मागण्या मान्य !

कुऱ्हा पानाचे येथे ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन यशस्वी , मागण्या मान्य !
भुसावळ      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     – येथून जवळच असलेल्या कुऱ्हा पानाचे येथे रस्ता दुरुस्तीला वेळ लागत असल्याने व वारंवार अपघात होत असल्याने कुऱ्हा पानाचे ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता तसेच त्यामुळे दि.२५ रोजी सकाळी आंदोलन सुरू केले आंदोलन सुरू करताच पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केली तसेच कामाला तात्काळ सुरुवात केली तसेच सर्व मागण्या मान्य करण्याचे पत्र दिल्याने कुऱ्हा पानाचे गावातील आंदोलन यशस्वी झाल्याचे श्रीकांत बरकले व सहकाऱ्यांनी सांगितले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कुऱ्हा (पानाचे) परिसरातील एस एच ४४ महामार्गावरील किमी ५८/०० ते ६०/०० या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. ठेकेदाराने काम सुरू करून पुन्हा बंद ठेवल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावरून दररोज महिला, शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांची ये-जा असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवास त्रासदायक झाला आहे. त्यामुळे आंदोलन कर्त्यांनी प्रशासनाला आमचे थेट प्रश्न विचारले त्यात काम मंजूर होऊनही पूर्ण का झाले नाही ?,
काम सुरू करून पुन्हा बंद का ठेवले ? ठेकेदारावर कारवाई का नाही ? सामान्य नागरिकांनी आणखी किती दिवस त्रास सहन करायचा? आम्हाला आश्वासन नको, तर प्रत्यक्ष काम सुरू झालेले पाहिजे तसेच दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करुन सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लेखी आश्वासन द्यावे अशी मागणी केली होती. त्यात
योगेश पाटील,अतुल पाटील, श्रीकांत बरकले, किशोर रोनखेडे तसेच समस्त ग्रामस्थ कुऱ्हा (पानाचे) यांचा सहभाग होता.यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचे समजते आंदोलन स्थळी बोदवड चौफुलीवर पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी, पोलीस पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
* चौकट*
पोलीस निरीक्षकांची मध्यस्थी
रस्ता रोको आंदोलनाची सुरुवात होताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी सुरवातीपासून बांधकाम अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून कामाला थेट सुरुवात करण्यात यावी यासाठी मध्यस्थी केली

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या