शहरातील जामनेर रोडवर मध्यरात्री अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीला जोरदार धडक ने व्यक्ती ठार झाल्याची घटना घडली आहे .
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास हॉटेल चेतनसमोरून संदीप मधुकर बऱ्हाटे वय ४१ , रा.सरस्वती नगर, जामनेर रोड, भुसावळ हे पायी जात असतांना तेथून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या अपघात बऱ्हाटे जागीच ठार झाले आहेत .
अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची नोंद केली.
याप्रकरणी ऋषभ सुरेश बऱ्हाटे रा . चोरवड, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार जयेंद्र पगारे करीत आहेत .


