Thursday, November 26, 2026
Homeजळगावबाल संस्कार विद्या मंदिरात संविधान दिन उत्साहात साजरा

बाल संस्कार विद्या मंदिरात संविधान दिन उत्साहात साजरा

बाल संस्कार विद्या मंदिरात संविधान दिन उत्साहात साजरा

यावल       खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        दि.२६    येथील बाल संस्कार विद्या मंदिरात भारतीय संविधान दिनानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन,संविधान व्याख्यानमाला, प्रश्नमंजुषा व चर्चासत्र अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक प्रशांत महाजन होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.धीरज चौधरी,ॲड.मयूर सुरळकर उपस्थिती होते.प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व,संविधान निर्मितीचा इतिहास,संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्ये तसेच संविधानाच्या उद्देशिकेतील स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व सोप्या व प्रभावी शब्दांत समजावून सांगितले.

तसेच संविधान हे केवळ पुस्तक नसून प्रत्येक भारतीय नागरिकाच्या जीवनाचा आधार आहे.विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावीत आणि जबाबदार,सुजाण नागरिक बनावे असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
प्रश्नमंजुषा व चर्चासत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची माहिती मिळण्यासोबतच लोकशाही मूल्यांची जाणीव झाली.

अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ होण्यास निश्चितच मदत होईल,असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त अध्यक्ष,मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या