Friday, November 22, 2024
Homeहत्याअमळनेरात धारदार शस्त्राने एका ३५ वर्षीय महिलेचा खून! 

अमळनेरात धारदार शस्त्राने एका ३५ वर्षीय महिलेचा खून! 

अमळनेरात धारदार शस्त्राने एका ३५ वर्षीय महिलेचा खून !

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – धारदार शस्त्राने एका ३५ वर्षीय महिलेचा खून करण्यात आल्याची घटना अमळनेरातील गांधलीपुरा भागात मेहतर कॉलनीजवळ रविवारी उघडकीस आली. शीतल जय घोगले (३५) असे या मृत महिलेचे नाव आहे. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, या खून प्रकरणात शीतल हिची नणंद मंगला परशुराम घोगले व करण मोहन गटायडे (३५) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पारोबाई परशुराम घोगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची मुलगी मंगला घोगले व सून शीतल घोगले या सकाळी ९ वाजेच्या सुमारास बाहेर गेल्या होत्या. मंगला ही १० ते १५ मिनिटांत परत आली; तर शीतल बराचवेळ होऊनही परत आली नव्हती.कुटुंबीयांनी शोध घेतला असता हात व डोक्यावर वार केलेल्या गंभीर अवस्थेत ती दिसली. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, शवविच्छेदन पारदर्शी करण्यात यावे, अशी मागणी नातेवाइकांनी केली. शीतलची सासू पारोबाई परशुराम घोगले यांनी फिर्याद दिली. त्यावरून अमळनेर पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या