Friday, April 17, 2026
Homeगुन्हासव्वा लाखाच्या मद्यसाठ्यासह चारचाकी जप्त !

सव्वा लाखाच्या मद्यसाठ्यासह चारचाकी जप्त !

सव्वा लाखाच्या मद्यसाठ्यासह चारचाकी जप्त !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जामनेर तालुक्यातील पहूर जवळ जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी संध्याकाळी ७ वाजता नाकाबंदी दरम्यान संशयास्पद कारमधून सव्वा लाखांचा मद्य साठा व साडेसहा लाखांची कार असा पावणेआठ लाखांचा मुद्देमाल पहूर पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, आचारसंहिता लागू केली असल्याने पोलिस दलाच्या वतीने नाकाबंदी सुरू आहे. या दरम्यान पहूर जवळ जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक भारत दाते, कर्मचारी गोपाळ माळी, विनोद पाटील ज्ञानेश्वर ढाकरे व हेमंत सोनवणे यांच्या पथकास एमएच२०/इइ३०९७) छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी संशयास्पद कार आढळली.पथकाने कार थांबवून चालक दिलीप अशोक पाटील (धुळे) याची चौकशी करून कारची तपासणी केली. चालकाचे बोलणे संशयास्पद आढळले.

कारमध्ये १ लाख २५ हजार ४३० रूपये किमंतीचा देशी-विदेशी अवैध मद्यसाठा आढळला. या मद्यसाठ्यासह साडेसहा लाखांची कार असा ७ लाख ७५ हजार ४३० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून संबधित चालकाला अटक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या