गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडले


धरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरापासून जवळच असलेल्या हॉटेल सिंधू गार्डन समोरील रस्त्यावर अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे वाहन धरणगाव पोलिसांनी १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता कारवाई करुन पकडले आहे. पोलिसांनी हे वाहन जप्त केले असून तीन गायींची सुटका करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दुपारी २ वाजता तिघांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगावपासून जवळच असलेल्या हॉटेल सिंधू गार्डन समोरील रस्त्यावरुन गुरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री ९ वाजता कारवाई करुन वाहन (एमएच- २८, बीबी- ४७१३) वर कारवाई केली. कारवाई केल्यानंतर पोलिसांनी वाहन जप्त केले असून ३ गायींची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नागराज साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दादाराव बाबुराव अहिरे (वय ३५), विजय राजू सूर्यवंशी (वय २८) आणि नितीन पाटील (तिन्ही रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक उमेश पाटील करत आहेत.

