प्रतिष्ठा महिला मंडळाच्या उद्योजक मेळाव्यातून महिला स्वावलंबी होण्यासाठी सक्षम होणार !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सहयोगाने तीन दिवसीय मेळाव्याचे उद्घाटन नुकतेच ब्राह्मण संघ येथे संपन्न झाले आहे, या महिला उद्योजक मेळाव्यात शहरासह तालुक्यातील विविध बचत गटाच्या महिलांसह स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या महिलांच्या हाताला मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे.प्रतिष्ठा महिला मंडळाचा सलग १२ वर्षांपासून सुरू असलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत भुसावळात डॉ. संगीता बियाणी व डॉ. नीलिमा नेहते यांनी व्यक्त केले.

भुसावळ शहरातील ब्राह्मण संघात तीन दिवसीय मेळाव्याचे शनिवारी त्यांच्याहस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.महिला उद्योजक मेळाव्यात दिवाळी सणाला लागणाऱ्या विविध वस्तू एकाच दालनाखाली उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिवाळी पदार्थ असो वा सजावटीचे साहित्य हे एकाच छताखाली ब्राह्मण संघात उपलब्ध होईल व शहराची मोठी बाजारपेठ महिलांना या मेळाव्यातून उपलब्ध झाल्याने आयोजकांचे मान्यवरांनी भाषणात तोंड भरून कौतुक केले. सणा-सुदीच्या काळात महिलांच्या हाताला रोजगार मिळाला असून त्या माध्यमातून त्या स्वावंलबीदेखील झाल्याचे दोन्ही मान्यवरांनी मनोगतातून सांगितले.प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दरवर्षाप्रमाणे २६ ते २८ ऑक्टोबर या काळात ब्राह्मण संघात तीन दिवसीय महिला मेळावा सुरू आहे.



