Sunday, September 20, 2026
Homeजळगावजळगाव येथील बेंडाळे कॉलेज च्या विद्यार्थीनींला परिक्षेत गैरहजर दाखविले

जळगाव येथील बेंडाळे कॉलेज च्या विद्यार्थीनींला परिक्षेत गैरहजर दाखविले

जळगाव येथील बेंडाळे कॉलेज च्या विद्यार्थीनींला परिक्षेत गैरहजर दाखविले

जळगांव येथील अण्णासाहेब जी डी बेंडाळे या महाविद्यालयात अनिता गंभीर सोनवणे नावाची विद्यार्थिनी बी ए च्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असताना तिने इंडियन फायनन्सशियल मार्केट हा पेपर दिला असल्यावर सुद्धा तिला गैरहजर दाखवल्याने तिचे शैक्षणिक नुकसान होत आहे .
तिने याबाबत कॉलेजच्या शिक्षकांना कळवूनही चार महिन्यापासून अद्याप दखल न घेतल्याने तिने जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांच्या याबाबत तक्रार अर्ज दिला आहे . याबाबत दीपक गुप्ता यांनी याबाबत संबंधित सरां शी संपर्क साधला असता त्यांनी मी बाहेर गावाला आहे . आल्यानंतर मार्ग काढतो असे उत्तर दिले आहे . परंतु सदर विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने याबाबत त्वरित दखल घेण्याची आवश्यकता आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या