सोडण्यात यावे. गावात आणि कॉलनी परिसरात घंटा गाडी नियमित येत नसून सर्वदूर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गटार काढणारे स्वच्छता कर्मचारी यांना गटारीची स्वच्छता करण्यास सांगितल्यास ते महिलांशी हुज्जत घालून, ते म्हणता तुम्ही आमची कंप्लेंट करा अशा मगरूरीच्या भाषेत ते महिलांशी अरेरावी करतात. दररोज कचरा काढणारे आणि घंटागाडी नियमित येऊन या नागरी समस्या सोडवाव्या. समस्या नाही सुटल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.