भाई को पिछले साल मारा था अब तेरा ‘खेल खत्म’ असे म्हणत तरुणावर गोळ्या झाडून खून !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – नवीन वर्षाचा पहिला आठवडा संपल्याबरोबर भुसावळ जंक्शन गोळीबाराने हादल्याने पुन्हा गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली,भाई को पिछलेसाल मारा था अब तेरा ‘खेल खत्म’ असे म्हणत तरुणावर गोळ्या झाडून खून करण्यात आला याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,शहरातील जाम मोहल्ला भागातील शालिमार हॉटेल जवळील डी.डी सुपर कोल्ड्रिंक्स अँण्ड टी हाऊस दुकानांमध्ये तेहरींम अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख व जवाई जाकीर मेहबूब खान हे दोघे सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास चहा पित होते.त्या ठिकाणी दुकानाजवळ अचानक ५ ते ६ इसमांनी हातात बंदूक घेऊन तैरींम अहमद यास शिवीगाळ करीत सिनेस्टाईल गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवार १० जानेवारी २०२५ रोजी घडली.याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दरम्यान नेहमी प्रमाणे तैरींम अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख व जवाई जाकीर मेहबूब खान हे दोघे सकाळी ६ वाजेला नमाज पठण करण्यासाठी जायचे व त्यानंतर डी.डी सुपर कोल्ड्रिंक्स अँण्ड टी हाऊस दुकानांमध्ये नेहमीप्रमाणे चहा पित असत. मागील वर्षी खडका रोडवरील हिरा हॉल जवळ पटेल परिवारातील एका युवकांचा पूर्व-वैमनस्यातून खून करण्यात आला होता याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला अठरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचाच डाव मनात धरीत ” पीछले साल हमारे भाई को मार डाला “असे बोलून संशयित आरोपी तनविर मजीत पटेल,अनवर पटेल, रमीज पटेल,शेख साहिल शेख रशीद,मजीत पटेल,अदनान शेख युनूस अशांनी मिळून जाम मोहल्ला भागातील डी.डी सुपर कोल्ड्रिंक्स अँण्ड टी हाऊस दुकानांमध्ये तैरींम अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख यांच्यावर बंदुकीने तीन गोळ्या झाडून खून करून पसार झाले आहे.बाजारपेठ पोलीस स्टेशनला जाकीर मेहबूब खान ( वय. ४५ ) राहणार जाम मोहल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहे.
पोलिसांचा ताफा दाखल ….
सदरील घटना ही पूर्ववैमनस्यातून झालेली असून तैरींम अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख (मयत) यास मारण्यासाठी बाहेरील काही सुपारी किलर यांना बोलावून हा खून करण्यात आल्याची शक्यता आहे.खून करणारे इसमांनी उंची सहा फूट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून यांनी गोळ्या झाडून कित्येक वेळेपर्यत बिनधास्तपणे शहरातच वावरत होते.सदरील घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड,बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ त्याचप्रमाणे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ठसे तज्ञ युनिट दाखल …
जळगांव येथील ठसे तज्ञ युनिट मधील पोलीस हवालदार निलेश भावसार,किरण चौधरी, शिवदास नाईक अशांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली व नमुने घेतले.
श्वान पथक दाखल…
सदरील घटना ही गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे.या घटनेतील संशयित आरोपींचा लवकरात – लवकर शोध घेण्याकामी वरिष्ठांचा आदेशावरून श्वान पथकास भुसावळात पाचारण करण्यात आले आहे.मात्र पोलिसांना कुठलेही संशयित आरोपी मिळून आलेले नसून शेवटी अपयश आलेले आहे.
दोन दिवसांपूर्वीच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी भुसावळ पोलीस उपविभागाला भेट दिली व पोलीस स्टेशनची पाहणी केली व उकृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.मात्र प्रसार माध्यमांनी तालुक्यातील गुन्हेगारी,अवैध धंदे,हद्दीपार, बनावट नोट प्रकरण,मोटरसायकल चोरी, असे अनेक प्रश्न संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना टाळण्यात आले.