गुन्हा दाखल झाला परंतु रस्त्याचे काम केव्हा सुरू होईल..? आरोपींना अटक न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित.

सार्वजनिक बांधकाम उपअभियंता यांच्या कारवाईची मागणी.
यावल दि.६ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील वड्री – हरीपुरा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या बांधकाम विभाग आणि पोलीस पथक यांच्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून,आरडा ओरड करून आणि जीवे ठार मारण्याची धमकी देण्याच्या कारणावरून ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला परंतु रस्त्याचे काम कधी सुरू होणार..? आणि आरोपीना अटक कधी होणार..? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत आहेत तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची आणि कर्तव्यात कसूर केल्याची कारवाई ची मागणी या प्रकरणातील त्रयस्त फिर्यादी गोविंदा सुरवाडे यांनी केली आहे.
अतिक्रमण काढण्याचे कार्यवाही करणे कामी पोलीस बंदोबस्तात रवाना झालेल्या.हरीपुरा वड्री रस्ता प्रजिमा ११ हडकाई नदीवर पुलाचे बांधकाम झालेले असुन तसेच उर्वरीत पोच मार्गाचे काम प्रगतीत आहे.सदर ठिकाणी शेती गट नं. ८९ जवळ रशीद रमजान तडवी याने पोच मार्गांचे अतिक्रमण करुन फळबाग लावले हे कोणाच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने लावले आहे याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा असून रस्ता रहदारीस मोकळा करण्यास आणि रस्त्याचे काम होण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी पोलीस बंदोबस्तात त्या ठिकाणी गेले असता आरोपींनी सदर ठिकाणी शासकीय कामात अडथळा निर्माण करून अतिक्रमण काढण्यास विरोध करून आरडा- ओरड करून केला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. गेल्या ४ दिवसात आरोपींना अद्याप अटक झाली नाही,आणि रस्त्याच्या कामाला सुद्धा सुरुवात न झाल्याने तसेच प्रकरणातील एका आरोपीचे नाव सुद्धा चुकीचे नमूद झाल्याने आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फिर्यादी अधिकारी यांनी काही आरोपींची नावे फिर्यादीत नमूद न केल्याने ग्रामस्थांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून अतिक्रमण केव्हा निघणार..? आणि रस्त्याचे काम केव्हा सुरू होणार..? तसेच या प्रकरणात न्यायालयाचा आदेश निर्णय असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी जाणून-बुजून हेतू पुरस्कर अतिक्रमण धारकांना वेळ आणि संधी उपलब्ध करून दिल्याने अतिक्रमण काढणे संदर्भात दिरंगाई व कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी येथील या प्रकरणातील त्रयस्थ फिर्यादी गोविंदा सुरवाडे यांनी केली आहे.
——————————————–
आदिवासी अधिकाऱ्याकडून आदिवासी योजनेला हरताळ फासण्याचा प्रयत्न…
शेतकऱ्यांच्या हितासाठी वड्री हरिपुरा रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी आदिवासी योजनेतून भाजपाचे कै.लोकप्रिय आमदार हरिभाऊ जावळे यांनी प्रस्ताव मंजूर केला होता आणि आहे त्यानंतर आमदार शिरीषदादा चौधरी यांनी या पुलाचे उद्घाटन केले परंतु मतदारांची लोकप्रियता टिकून राहण्यासाठी आमदार चौधरी यांनी पूला जवळील अतिक्रमण काढण्यासाठी कोणतीही कार्यवाही न केल्याने पुलाचे १ कोटी ९३ लाख रुपयाच्या पुढील रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित राहिले.या रस्त्यावरून परसाडे,वड्री,हरीपुरा गाड्र्या -जामन्या मोहराळे इत्यादी परिसरातील हजारो शेतकऱ्यांची, नागरिकांची वाहनांच दररोज वर्दळ असते आणि शेती शिवारात जाण्या येण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असते,आदिवासी योजनेतील काम असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आदिवासींच्या समस्या लक्षात न घेतल्याने विद्यमान आमदार अमोलदादा जावळे यांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी कार्यवाही करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहेत.
–

