यावल येथील साने गुरुजी विद्यालयात संत रविदास जी महाराज यांची जयंती साजरी.

यावल दि.१२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल नगरपरिषद संचलित,
पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,यावल येथे आज दि.१२ रोजी संत रविदासजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही.ए.काटकर सर यांनी केले यावेळी ज्येष्ठ शिक्षक डी.एस.फेगडे सर,एन.डी.नेवे सर तसेच सर्व शिक्षक,शिक्षिकेतर कर्मचारी बंधू -भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्सव समिती प्रमुख श्रीमती इंदिरा रायसिंग मॅडम यांनी केले तसेच विद्यालयाचे शिक्षक पी.एच.
भालेराव सर यांनी संत श्री रविराज जी महाराज यांच्या महान कार्य बाबत आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षक,शिक्षिकेतर
कर्मचारी बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.

