सावदा ता. रावेर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन ,रुग्णांनी दिला प्रतिसाद
खानदेश लाईव्ह न्युज भुसावळ प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट )पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच तसेच शिवसेना रावेर लोकसभा जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रेरणेने आणि नेतृत्वाखाली तसेच रावेर लोकसभा महिला जिल्हाप्रमुख नंदा प्रकाश निकम यांचे अध्यक्षतेखाली महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त शिवसेना(शिंदे गट ) यांचेतर्फे सावदा ता. रावेर येथे ऑल इज वेल हॉस्पिटल बऱ्हाणपूर, आदर्श दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था रावेर यांचे सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी परिसरातील गरीब, गरजू आणि वंचित लोकांची नेत्र, मधुमेह, रक्तदाब, ह्रिदय, तसेच हाडांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यांना आरोग्यविषयक माहिती, आवश्यक औषधी डॉ. महाजन यांचेतर्फे देण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना रावेर लोकसभा महिला प्रमुख नंदा निकम यांनी मनोगत व्यक्त केले, त्यांनी जमलेल्या गरजू लोकांना शासकीय आरोग्य योजनांची सविस्तर माहिती दिली. शासनाच्या विविध योजना नागरिकापर्यंत पोहचविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी जिल्हा उपाध्यक्ष श्याम अविनाश अकोले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी, भगवान पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले .
आरोग्य शिबिराला सावदा महिला शहरप्रमुख वैशाली लीलाधर पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाला शिवसेना सावदा शहरप्रमुख सुरज परदेशी, ईशानी प्रशांत अकोले, नीता दीपक कोष्टी, व्ही. पी. पाटील, कृष्णा पाटील, निखिल नेमाडे, स्वाती भंगाळे, रुपाली महाजन सुनिता तायडे, दिनेश सैमिरे ई. शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.