आरटीओ आणि पोलीस विभागाच्या नाकावर टिचून पासिंग न झालेल्या कंपनीच्या वाहनांमधून मालवाहतूक बाजार समितीच्या माध्यमातून !
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे याकडे दुर्लक्ष.
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – नव्या कोऱ्या बोलोरो पिकअप व्हॅन मालवाहतूक वाहने कंपनीतून बाहेर निघाल्यानंतर डीलरकडे जाताना आणि आरटीओ कडून पासिंग न झालेल्या वाहनातून सर्रासपणे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीसह इतर ठिकाणाहून मालवाहतूक होत असल्याने याकडे आरटीओ आणि पोलीस यांच्यासह यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की बोलोरे पिकअप व्हॅन नवी करकरीत असलेली आणि कोणत्याही आरटीओ विभागाकडून पासिंग न झालेली वाणी यावल बाजार समितीत माल भरून वजन माफ करून दुसऱ्या राज्यात पटनाकडे जात आहे ही मालवाहतूक पासिंग न झालेल्या वाहनातून होत असताना याकडे जळगाव जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेशातील आणि इतर राज्यातील आरटीओ आणि पोलिसांचे आर्थिक संघटना त्यामुळे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्व स्तरातून केला जात आहे.वाहन आणि फिट जितके जास्त तितकी पैशांची वसुली येथे ची जोरदार कमाई असे असताना आता कंपनीतून सरळ डीलर कडे जाणारी बोलोरो पिकप वाहने कोणत्याही आरटीओ कडून पासिंग न झालेली वाहने कंपनीच्या सेल्स मॅनेजर आणि ट्रान्सपोर्ट कंपनी तसेच आरटीओ पोलीस यांना चिरीमिरी देऊन ठिक ठिकाणाहून नव्या कोरकुरीत वाहनातून मालवाहतूक करीत आहे हे आरटीओ आणि पोलिसांना दिसत नाही का..? किंवा आरटीओ आणि पोलीस या वाहन धारकांकडून कडून प्रत्येकी किती रक्कम घेतात आणि किती कमाई करीत आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आरटीओ कार्यालयाकडून मुदत संपलेल्या वाहनांच्या मालकांकडून पर्यावरण कर वसुलीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत त्यात मुदत संपलेल्या वाहनांची तपासणी करणे वाहन विक्री केल्यानंतर आरटीओ कार्यालयातील वाहन हस्तांतरण दरम्यान पर्यावरण कर वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दुचाकी किंवा चार चाकी वाहनांच्या निर्मितीस पंधरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते चालवायचे असेल तर पर्यावरण कर भरणे सक्तीचे आहे जुन्या वाहनांचा पर्यावरण कर भरून घेताना त्या वाहनांमुळे प्रदूषण होत नाही ना याची खात्री करून घेतली जाते तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी निकष ते पूर्ण करीत असेल तरच कर भरून घेतला जातो जुन्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होऊ नये म्हणून राज्य सरकारने सन 2010 पासून पर्यावरण कर आकारणीस प्रारंभ केला आहे असे असताना मात्र आरटीओ
विभागातील संबंधित अनेक अधिकारी कर्मचारी मात्र रस्त्यावर दरोडेखोरांसारखे उभे राहून वाहनांकडून बेकायदा रक्कम घेऊन व अनेक सर्रासपणे सोडून देतात आणि ते प्रत्यक्ष इतर नागरिकांना दिसून येत आहे अनेक वाहने यांची मुदत संपल्यावर सुद्धा महामार्गावर आणि जिल्ह्यातील इतर रस्त्या रस्त्यावर कशी काय प्रवासी वाहतूक करता हे आरटीओला दिसून येत नाही का..?
लग्नसराई प्रत्येक क्रुझर चालकाकडून पैसे घेऊन वाजवीपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करण्यास प्रोत्साहन करीत आहे यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत हे आरटीओ खात्याला दिसून येत नाही. आरटीओ आणि पोलीस ठीक ठिकाणी मोठमोठ्या संख्येने उभे राहून सर्रासपणे वसुली करीत आहेत यात वसुलीचे टार्गेट पूर्ण होण्यासाठी अधिकारी सुद्धा पोषक वातावरण निर्मिती करून देत असून काही ठिकाणी रात्रंदिवस पोलीस कलेक्शन करण्यासाठी उभे असलेले दिसून येतात हे कशासाठी इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी आता तर नव्या करकरीत न पासून झालेल्या वाहनांमधून यावल बाजार समितीसह इतर ठिकाणाहून अनेक प्रकारचे माल भरून वाहतूक सुरू आहे. यांना आरटीओ आणि पोलीस काही विरोध करणार आहे किंवा नाही याबाबत जनतेमध्ये चर्चा आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीतून कच्चे पपई भरून नवीन पासिंग न झालेल्या बोलोरो पिकप व्हॅन मधून टन गणती पपई भरून वजन काट्यावर मोजमाप करून परराज्य म्हणजे पटनाकडे सर्रासपणे वाहतूक होत आहे या अवैध मालवाहतुकीला यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचा सुद्धा छुपा आशीर्वाद असल्याचे दिसून येत आहे यांच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये न पासिंग झालेली वाहने कैद होत असली तरी यांनी आरटीओ आणि पोलिसांना माहिती देणे प्राप्त असताना माहिती दिली आहे किंवा नाही याबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.

