पृथ्वीवरील वायु , जल , ध्वनी प्रदूषण, अवैध वृक्षतोड, प्लास्टिक मुक्त, निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे , संरक्षण व संवर्धन करूया.
खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भुसावळ पर्यावरण मित्र डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन
अन्न, वस्त्र ,निवारा आरोग्य देणारी पृथ्वी तिच्यावरील असलेले सर्व जीवसृष्टीचे निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन, पृथ्वी दिन म्हणून साजरा केला जातो असे यानिमित् पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्र सिंग पाटील यांनी निसर्गनिर्मित साधन संपत्ती काही कारणास्तव कमी कमी होत चालली आहे त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडलेला असून आपणास अनेक संकटांना सामना करावा लागत आहे.
आपणास भूकंप, ढगफुटी, वृक्षतोडीमुळे तसेच जंगलात पाणी नसल्यामुळे अनेक पशुपक्षी जंगल सोडून गावात शिरायला लागलेली आहे.

ऑक्सिजनची कमी झाल्यामुळे करोना सारख्या संकटांना तोंड द्यावे लागले आहे हे आपण सर्वानी अनुभवले आहे . त्यामुळे प्रत्येकाने संवर्धनासहित वृक्षारोपण करून आदरणीय पंतप्रधान जी द्वारे एक पेड माॅ के लिये चा आदर ठेवून घरातील प्रत्येकाने पृथ्वीवरील जीवसृष्टीस लागणारी ऑक्सीजन युक्त दीर्घकाळ टिकणारी तसेच विविध फळांची फुलांची झाडे लावून त्यांचे संगोपन करावे.
प्रत्येक प्राण्याची व वृक्षाची आवश्यकता आहे सर्व पशुपक्षी एकमेकांवर अवलंबून आहेत बरेचसे देश प्लास्टिक मुक्त असून भारतात सुद्धा प्लॅस्टिक बंदी आहे .
परंतु त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसल्यामुळे प्लास्टिक संकट आपल्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. जागतिक वसुंधरा दिन निमित्ताने संकल्प करूया संगोपणासहित वृक्षारोपणाचा ,प्लास्टिक मुक्तीचा, नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करण्याचा तसेच वसुंधरा दिनाच्या निमित्ताने 1मे पर्यंत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांच्या मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
आपण या अभियानात सहभागी होवुन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी व पृथ्वीवर जीव सृष्टी आबादित राहावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे आवाहन पर्यावरण तज्ञ सुरेंद्र सिंग पाटील यांनी केले आहे .