Saturday, May 2, 2026
Homeजळगावआमोदे येथे योगेशचा भव्य नागरी सत्कार... स्वच्छ प्रतिमा ठेऊन लोकसेवा करणार

आमोदे येथे योगेशचा भव्य नागरी सत्कार… स्वच्छ प्रतिमा ठेऊन लोकसेवा करणार

आमोदे येथे योगेशचा भव्य नागरी सत्कार…
स्वच्छ प्रतिमा ठेऊन लोकसेवा करणार

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

स्वच्छ प्रतिमा ठेवून व आई-वडिलांना कायम स्मरून समाजाच्या शेवटच्या घटकापासून लोकहिताचे निर्णय व कामे करणार असे लोकसेवा आयोग परीक्षेत ८११ रँक घेऊन उत्तीर्ण होणारा आमोद्याचा सुपुत्र योगेश पाटील यांनी नागरी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
आमोदे येथील ललित पंढरीनाथ पाटील यांचे चिरंजीव योगेश ललित पाटील यांनी अथक परिश्रम व कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन नुकतीच लोकसेवा आयोगाची परीक्षा ८११ रँकने उत्तीर्ण केली. गावातील नागरिकांनी योगेश पाटील यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून सर्वांनी अभिनंदन केले. तर ग्रामपंचायत कार्यालय तथा आमोदे गावातील विविध सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा भव्य नागरी सत्कार केला. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच जुगरा तडवी यांनी भूषविले.
सत्कारमूर्ती योगेश पाटील यांचा सत्कार आमोदे शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष उमेश पाटील, वि. का. सोसायटीच्या वतीने ललित महाजन, आमोदे श्रीराम दूध उत्पादक सोसायटी आमोदे यांच्या वतीने राजेंद्र ओंकार चौधरी, लेवा श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने सुरेश श्रीधर पाटील,
घ का विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक एस. बी. बोठे, तलाठी कार्यालय आमोदे यांच्या वतीने शैलेश झोटे, पोलीस पाटील तुषार चौधरी, पत्रकार संघातर्फे प्रा. उमाकांत पाटील यांनी सत्कार केला.
उमेश पाटील, प्रा. उमाकांत पाटील, मुख्याध्यापक एस बी बोठे, हिमानी राजपूत,
प्राचार्य दिलीप पाटील, नरसिंग पाटील, प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना योगेश भावनिक झाला. माझ्या यशामध्ये परिवाराचे व नातेवाईकांचे खूप मोठे योगदान आहे. ज्या आत्याने सांभाळ केला त्या आज नाहीत याची खंत व्यक्त करून योगेशच्या डोळ्यात अश्रू आले. संपूर्ण गावाने माझा सत्कार केल्याबद्दल मी आयुष्यभर हा क्षण विसरणार नाही. लोकसेवा आयोग नावाप्रमाणेच मी शेवटच्या घटकापर्यंत लोकसेवा करीत राहणार असे योगेशने यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक गौतम आधारवाडे यांनी केले. तर सूत्रसंचालन ललित पिंपरकर यांनी केले.
आभार उपसरपंच मनिषा चौधरी यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या