भोरगाव लेवा पंचायतीच्या उपाध्यक्षपदी शिशिर जावळे यांची निवड
भुसावळ – खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे यां संस्थेच्या भुसावळ विभागाची कार्यकारणी नुकतीच भुसावळ विभाग अध्यक्ष सुहास चौधरी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली आहे.
लेवा समाजाच्या सर्वांगीण हितासाठी , सामाजिक उपक्रम राबवणारी, समाजातील अनिष्ट चालीरीतीं विरुद्ध लढणारी,तथा न्यायनिवाडा करणारी भोरगाव लेवा पंचायत एक सामाजिक संस्था आहे .
सदर संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्वच स्तरातील घटकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात.
या संस्थेच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रभर व इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात असून ही संस्था निस्वार्थ सेवाभावी कार्य करणारी एक आदर्श सामाजिक संस्था आहे. आणि अशा या संस्थेमध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा या उद्देशाने भोरगाव लेवा पंचायतीतर्फे प्रथमच भुसावळ विभागात युवकांची कार्यकारणी निवड करण्यात आली.
याप्रसंगी गाव तिथे शाखा स्थापन करण्याचा निर्धार कार्यकारणी निवड बैठकीवेळी घेण्यात आला आणि या बैठकीत भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते , लेवा हितवादी चळवळीचे प्रणेते तथा भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे सचिव शिशिर दिनकर जावळे यांची भोरगाव लेवा पंचायती च्या भुसावळ विभागाचे युवा उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे .
शिशिर जावळे यांचा संपर्क चांगला असून या निवडीने संघटना वाढीस मदत होईल .
याप्रसंगी भोरगाव लेवा पंचायत भुसावळचे सचिव सुभाष भंगाळे ,प्रा . धीरज पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते .
लेवा समाजाच्या सर्वांगीण उत्पन्न उत्कर्षासाठी विकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थपणे समाजकार्य करणार असल्याचे शिशिर जावळे यांनी यावेळी मनोदय व्यक्त केला आहे.
या निवडी बद्दल शिशिर जावळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत .