Saturday, May 10, 2025
Homeजळगाववरणगावमध्ये शिवसेनेतर्फे मुली व महिलांसाठी मोफत कराटे- लाठीकाठी आत्मस्वसंरक्षण प्रशिक्षण

वरणगावमध्ये शिवसेनेतर्फे मुली व महिलांसाठी मोफत कराटे- लाठीकाठी आत्मस्वसंरक्षण प्रशिक्षण

वरणगावमध्ये शिवसेनेतर्फे मुली व महिलांसाठी मोफत कराटे- लाठीकाठी आत्मस्वसंरक्षण प्रशिक्षण

-महाराष्ट्र दिनी शुभारंभ; २८ एप्रिलपर्यंत नावे देण्याचे संतोष माळी यांचे आवाहन

वरणगाव –   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी    शहरातील नऊ वर्षांपुढील मुली व महिलांसाठी कराटे व लाठीकाठी मोफत आत्म स्वरक्षणासाठीचे एक प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एक मे पासून कराटे व लाठी काठी प्रशिक्षणाचा शुभारंभ होणार आहे. पुढील तीन महिने मुलींना मोफत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. २८ एप्रिल पर्यंत मुलींनी व महिलांनी आपली नावे देण्याचे आवाहन शिवसेनेचे भुसावळ विधानसभा प्रमुख तथा प्रशिक्षणाचे आयोजक संतोष माळी यांनी केले आहे.

प्रभू श्रीराम जयंती, श्री हनुमान जयंती, महावीर जयंती आणि थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या जयंती निमित्ताने मुलींना व महिलांना आत्मसंरक्षणासाठी कराटे व लाठी-काठीचे प्रशिक्षण पुढील तीन महिने मोफत दिले जाणार आहे. मुलींना व महिलांना कराटे प्रशिक्षक ब्लॅक बेल्ट असलेले विनोद सुरवाडे मास्टर हे दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत महात्मा ज्योतिबा फुले नगरातील महात्मा फुले हॉल येथे प्रशिक्षण देणार आहे. लाठीकाठीचे प्रशिक्षण केदार चंद्रकांत माळी देणार आहे. शहरातील मुलींनी आपले नावे संजय रामा माळी, सतीश पाटील, भूषण माळी, लीलाधर कोलते, महेश सपकाळे, प्रशांत निंबाळकर, शक्ती माळी, पंकज चौधरी, मनोज भोई यांच्याकडे द्यावीत असे आवाहन शिवसेनेचे संतोष माळी (आपला माणूस) यांनी केले आहे.

-कराटेमुळे मुली शारीरिक मानसिकदृष्ट्या मजबूत होतील

शहरातील मुली व महिलांसाठी सध्या स्थितीला आवश्यक असलेल्या आत्मसंरक्षणासाठी कराटे येणे आवश्यक आहे. कराटे शिकल्याने मुलींना शारीरिक व मानसिक दृष्ट्या मजबूत होण्यास मदत होते. कराटेमध्ये विविध तंत्र शिकली जातात ज्यामुळे मुली स्वतःचे आत्मसंरक्षण करू शकतात आणि धोक्याच्या वेळी प्रभावीपणे समोरच्यावर प्रतिकार करून स्वतःला वाचवू शकतील.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या