Monday, July 21, 2025
Homeजळगावसिंगल युज प्लास्टिकचा वापर न करण्याचा संकल्प करू या; डॉ. सुरेंद्रसिंग पाटील...

सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करण्याचा संकल्प करू या; डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन!

सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करण्याचा संकल्प करू या; डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पर्यावरण संरक्षणासाठी अनेक देशांबरोबर आपल्या भारतातही सिंगल युज प्लास्टिकला बंदी आहे. तरीही आपल्या देशात सिंगल युज प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून त्याचा पुनर्वापर होत नसल्यामुळे तसेच त्याचे विघटन होत नसल्यामुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग जमा होत आहे.

तसेच गावातील गटारी, नाले त्यामुळे पॅक होत असून नालीतील पाणी रस्त्यावर येत आहे. या कारणाने रोगराई पसरत आहे नद्यांमध्ये प्लास्टिक जात असल्यामुळे प्रदूषण होत आहे. पुढे समुद्रातही जात आहे.एकंदरीतच पृथ्वी विरुद्ध प्लास्टिक असे वातावरण निर्माण झालेले आहे.यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी पर्यावरण संतुलन राखत पृथ्वीवरील निसर्गनिर्मित सर्व सजीवांचे आयुष्य निरोगी राहण्यासाठी सिंगल युज प्लास्टिकचा प्रत्येकाने वापर न करण्याचा संकल्प करावा व प्रशासनास मदत करावी.सध्या युज अँड थ्रो म्हणजे वापरा व फेका ही वृत्ती जनमानसात रुजल्यामुळे सिंगल युज प्लास्टिकचा वापर सामुदायिक कार्यक्रमांमध्ये जसे लग्न समारंभ, बर्थडे तसेच धार्मिक कार्यक्रम व इतरही काही कारणानिमित्त होणाऱ्या सामुदायिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक ग्लास, वाट्या, चमचे इत्यादीचा वापर होत आहे. असे पर्यावरण तज्ञ पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी सांगत कुठलाही सामुदायिक कार्यक्रम करताना त्यात समाविष्ट प्रत्येक घटकाने सामुदायिक जबाबदारी घेत प्लास्टिक वापरू न देण्याचा संकल्प करावा.

उदाहरणार्थ ज्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन आहे. त्यांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर करता येणार नाही.अशी टीप कार्यक्रम ठरवताना टाकून द्यावी तसेच आपल्या येथे तसा बोर्डही लावावा.दुसरा महत्त्वाचा घटक कॅटरर्स यांनी कार्यक्रम ठरवताना आयोजकांना सिंगल युज प्लास्टिक, प्लास्टिक आवरण असलेले कागदी पान, कागदी ग्लास वापरणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगावे. आयोजकांनी ही तसे स्पष्ट सांगूनच ठरवावे रोज हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असलेल्या शिर्डी, शेगाव अशा संस्थांमध्ये संपूर्ण स्टीलचा वापर केलेला असतो.खाजगी कार्यक्रमात 500 एम एल पर्यंतच्या पाण्याच्या बाटलीचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून त्याचाही पुनर्वापर होऊ शकत नाही असे लक्षात आल्यामुळे त्यांच्यावरही काही दिवसातच बंदी येणार असल्याची माहिती पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्रसिंग पाटील यांनी दिली आहे.कुठल्याही कार्याला महिलांचे सहकार्य लागतच असते त्याप्रमाणे महिलांनी पर्समध्ये घरून पाण्याची बाटली किंवा ग्लास बरोबर घेतल्यास भरपूर मोठ्या प्रमाणात फरक पडेल. ज्या ठिकाणी आयोजक भेटवस्तू देत असतील तेथे चांगल्या पाणी थंड राहील अशा बाटलीच्या स्वरूपात दिल्यास बहुसंख्य ठिकाणी या बाटलीचा वापर होईल.

तसाच मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशवीचा वापर भाजी विक्रेते, फळ विक्रेते, विविध खाद्यपदार्थ विक्रेते अशा इतर अनेक ठिकाणी होत असतो यातही महिला वर्गाचा सहभाग लाभल्यास पूर्वीप्रमाणे सहकार्य करत प्लास्टिक पिशवीत वेगवेगळ्या न घेता एकाच कापडी पिशवीत घेता येईल. विक्रेत्यांनीही सुद्धा प्लास्टिक पिशवी बंदी असल्यामुळे आम्ही ठेवत नाही. आपण थैली आणली नसल्यास कापडी थैली विकत घ्यावी किराणा दुकानदारांनी प्लास्टिक पिशवीच्या ऐवजी पूर्वीप्रमाणे कागदी पिशव्यांचा वापर करावा. धार्मिक स्थळी जेथे वाटीमध्ये प्रसाद दिला जातो तेथे केळीचे पान,पळसाच्या पान अथवा पूर्वीप्रमाणे पळसाचे द्रोन चा वापर करावा. तरी आपले गाव, शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी प्रशासनाबरोबर लोक सहभागाची गरज असते.पृथ्वी वाचवूया प्लास्टिकचा वापर टाळूया असा संदेश त्यांनी दिला आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या