मुक्ताईनगरात घरपट्टी पाणी पट्टीच्या बनावट बिलाद्वारे लाखोचा गैरव्यवहार; कर्मचारीयांनीच बिले बनविल्याचा शिवसेनेचा आरोप!
मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – घर पट्टी व पाणी पट्टीची बनावट बिल बुके छापून मुक्ताईनगर न.पं. कर्मचा-यांद्वारा झालेल्या लाखोंच्या भ्रष्ट्राचाराची चौकशी होऊन तात्काळ कारवाई करावी अशा मागणीची तक्रार शिवसेना शहर प्रमुख प्रशांत टोंगे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केल्याने खळबळ उडाली आहे .
निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर नगरपंचायतीतर्फे शहरातील नागरिकांकडून घर पट्टी व पाणी पट्टी वसुलीच्या माध्यमातून नफा फंडातून कार्यालयीन कामकाज तसेच कर्मचायांचे वेतन व इतर महत्वपूर्ण खर्च भागवला जातो. परंतु येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला असून कुंपणच शेत खातंय अशी परिस्थिती निर्माण झालेली असून नगरपंचायत कारभार प्रशासक काळात गेल्यापासून येथे कर्मचाऱ्यांचा मनमानी व भ्रष्ट्राचारी कारभार प्रचंड वाढलेला असून सदरील पालिकेत सुरवातीपासून प्रभारी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार असल्याने याचा फायदा उचलत आहे
नगरपंचायत कर विभागातील कर्मचारी यांनी संगनमत करून घर पट्टी व पाणी पट्टीची बनावट बिल बुके छापून नागरिकांना करापोटी बनावट पावत्या देवून लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्याचे उघडकीस आलेले असून अनेक नागरिकांनी सदरील पालिकेत कर भरणा केल्यावरही त्यांच्या खात्यावर थकबाकी त्याच स्वरूपात दिसून येत असल्याने यासंदर्भात नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहे.
तरी माझ्याकडे प्राप्त तक्रारींची तात्काळ सखोल चौकशी करण्यात येवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रशांत टोंगे यांनी केली आहे.