Tuesday, March 10, 2026
Homeआंदोलनशेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रशासनाचा प्रयत्न दोन्ही आमदारांची मध्यस्थी

शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रशासनाचा प्रयत्न दोन्ही आमदारांची मध्यस्थी

शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रशासनाचा प्रयत्न दोन्ही आमदारांची मध्यस्थी
मुक्ताईनगर. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यांपासून मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलावर धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन चि रडण्याचा प्रशासनाचा डाव आज दोन्ही आमदारांच्या मध्यस्थीने ते आणून पाडण्यात आला.
इंदूर हैदराबाद 753 एल या रस्त्याच्या कामादरम्यान कामखेडा पुलावर पुलाचे काम सुरू असल्याच्या ठिकाणी शेतकरी गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून आंदोलन करत असून योग्य मोबदला शासकीय दरानुसारच मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असताना आज सकाळी अचानक मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पाऊस फाटा या ठिकाणी दाखल झाला व शेतकऱ्यांचा आंदोलनाला चिरण्याचा प्रयत्न करण्यात आला.
याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील व विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी घटनास्थळी जाऊन प्रशासनाला चांगलाच जाब विचारला नॅशनल अतुल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांची याप्रसंगी दोघे आमदाराने चांगलीच कान उभारणी केली.
याप्रसंगी शेतकऱ्यांनी आक्रोश करत आम्ही दहशतवादी आहोत का की पाकिस्तानचे नागरिक आहोत आम्हाला मारण्यासाठी पोलीस प्रशासन एवढा ताफा घेऊन आलेला आहे तसेच ॲम्बुलन्स व इतर यंत्रसामग्री उभी करण्यात आली आहे असा आरोप याप्रसंगी शेतकऱ्यांनी केला विशेष म्हणजे हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने मशनरी सुद्धा उभी करून तात्काळ कामाला सुरू करण्यात आले होते शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर मग मात्र पोलिसांनी त्यांना अडवले दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील व आमदार एकनाथराव खडसे यांनी पवार यांना चांगलेच खडसावत या ठिकाणी दहशतवाद करू नका व शेतकऱ्यांना त्रास देऊ नका दोन दिवसात मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक झाल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले दरम्यान शिवाजी पवार यांनी सांगितले की येत्या महिनाभरानंतर पावसाळा सुरू होईल प्रसंगी कोणतीही जीवित आणि नागरिकांची होऊ नये त्यामुळे जो भाग संवेदनशील आहे तेवढे काम करून देण्याची विनंती त्यांनी शेतकऱ्यांना केली परंतु शेतकऱ्यांनी ती विनंती देखील त्यांची फेटाळत कोणत्याही प्रकारचे काम सुरू करू देण्यास नकार दिला.
याप्रसंगी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा दोन्ही आमदार महोदयांकडे व्यक्त केल्या शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज या आंदोलनाचा तीव्र निषेध देखील करण्यात आला

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या