भुसावळमध्ये जीएनआरएफ गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत थंड पाण्याच्या स्टॉलचे उद्घाटन
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी. भुसावळ येथे 29 एप्रिल मंगळवार रोजी उन्हाळ्यात तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, तिथे बस आणि ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सर्वाधिक टंचाई भासते.
हे लक्षात ठेऊन गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनच्या बॅनरखाली, भुसावळमधील बस स्थानक आणि रेल्वे स्थानकाजवळ थंड पाण्याचा स्टॉल सुरू करण्यात आला आहे, स्टालचे उद्घाटन भुसावळ नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी श्री परवेझ शेख यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर अजीत भट, मुकेश पाटील, व दीपक अहिरे उपस्थीत होते .
बस-ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या थंड पाण्याच्या स्टॉलवरून पाणी प्यायले आणि उष्णतेपासून आराम मिळाला. स्थानिक लोकांनी जीएनआरएफच्या या कार्याचे कौतुक केले आणि प्रोत्साहन दिले.
या कडक उन्हात, तहानलेल्या लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे केवळ तात्पुरते आराम देत नाही तर पाण्याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण देखील देते.
या प्रसंगी दावत-ए-इस्लामी इंडियाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री. झुबेर अत्तारी म्हणाले की,
गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन ही दावत-ए-इस्लामीची एक सामाजिक आणि कल्याणकारी शाखा आहे ज्याचे उद्दिष्ट लोकांची सेवा करणे आहे.
हे समाजातील लोकांची विविध प्रकारे सेवा करते. हिवाळ्यात गरीब आणि गरजूंना ब्लँकेट वाटप करणे, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, वृक्षारोपण हंगामात रोपे लावणे आणि आरोग्य समस्यांनी ग्रस्त लोकांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करणे, तसेच वेळोवेळी रक्तदान शिबिरे आयोजित करणे, तसेच गरजू आणि गरिबांना रेशन किट वाटप करणे ही या विभागाची मुख्य आणि विशेष कामे आहेत. त्यांनी सांगितले की ज्यांना या उदात्त कार्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जीएनआरएफचे जिल्हाध्यक्ष रफिक रोशन कादरी, सईद अत्तारी, हाजी तन्वीर, फरीद शेख, अझहर कादरी, फरीद शेख, युसूफ खान जहांगीर शेख, शोएब अत्तारी, आसिफ अत्तारी यांनी प्रयत्न केले.