अक्षय तृतीयासाठी भगिनींनी झोके खेळण्यासाठी वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होण्याची आवश्यकता : पर्यावरण मित्र डॉ. सुरेंद्रसिंग पाटीलांचे आवाहन!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अक्षय तृतीया या सणाला महाराष्ट्र मध्ये खूप महत्त्व आहे. मुलीचे, बहिणीचे लग्न झाल्यावर दिवाळीनंतर अक्षय तृतीयेला माहेरी येऊन काही दिवस राहण्याचा रीतीरिवाज आहे. मुलांनाही या काळात शाळेला सुट्टी असते सर्वांना मामाच्या गावाला जाण्याची घाई झालेली असते . माहेरची मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात.
झाडाला झोके बांधून झोके खेळण्याचा आनंद विविध प्रकारचे गाणे म्हणून मनसोक्त आनंद लुटत असतात ही परंपरा आहे. यावेळी मुलांना मोकळ्या हवेत खेळता येते.सद्यस्थितीत बहुसंख्य ठिकाणी बंगई टांगलेली असते किंवा झोके बांधण्यासाठी कड्या लावलेले असतात परंतु ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात वाढ होऊन सकाळपासून ते रात्रीपर्यंत गरम हवा असल्यामुळे घरातील तसेच गच्चीवरील,अंगणात असलेले सर्व प्रकारचे झोके धुळ खात पडलेले आहेत .त्यामुळे माहेरी जाण्याची ओढ लागलेली असते. तरी आपण सद्यस्थितीत राहत असलेल्या ठिकाणी सुद्धा वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होणारे झाडे लावावेत त्यामुळे तापमानात घट होऊन आपणासही निसर्गाची शुद्ध हवा मिळून वातावरण प्रदूषण मुक्त होण्यास मदत होऊन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासही मदत होते . झाडे लावण्याचे काम जरी माणसे करत असली तरी त्या झाडांचे संगोपन महिला वर्गाशिवाय शक्य नाही.तरी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने संगोपनाचा संकल्प करून आपल्या घराजवळ विविध फळ ,फुले तसेच ऑक्सिजनयुक्त झाडांचा वृक्षारोपणाचा आपल्या घरातील पुरुष वर्गास आग्रह करावा. झाडे लावा झाडे जगवा . झाडे लावूया, झाडे जगवू या पर्यावरणाचा समतोल राखत वसुंधरेची शान वाढवूया.
असे आवाहन सुरेंद्र सिंग पाटील यांनी केले आहे .