Saturday, May 2, 2026
Homeजळगावजंगली रानफळांची यावलकरांना भुरळ...

जंगली रानफळांची यावलकरांना भुरळ…

जंगली रानफळांची यावलकरांना भुरळ…

यावल दि.२   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आदिवासी डोंगराळ भागात औषधी वनस्पती सृष्टी बरोबरच उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात रानफळांचा बहर आलेला आहे. यावल शहरा पासूनच पाच किमी अंतरावर सातपुडा पर्वतरांग पसरलेली आहे. सातपुड्याच्या डोंगरात वेगवेगळी रान फळे उन्हाळ्यातील वैशाख ज्येष्ठ महिन्यात वसंत ऋतूत चाखायला मिळतात. डोंगराळ भागात शेतीचे काम करणारे शेतकरी, ढोर चारणारे गुराखी, पायवाटेने पायपीट करणारे पाहुणे, रावळे, खेड्यातील लहान मुलं उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता वाढत असतानाही रानफळे शोधण्यासाठी जंगलातील पायवाटेने धुंडाळतात टेंभरून झाडाची उंची ५० ते ६० फुटापर्यंत वाढते. झाडाची साल वरून काळसर असते त्याचा आयुर्वेदिक औषधी म्हणून खोकल्यासाठी वापर केला जातो. आदिवासी गोंडी बोलीत या झाडाला तेंदू म्हणतात. टेंभुर्णीच्या पानापासून व पत्रावळी बनवतात आदिवासी बांधव डोंगराळ भागात फिरून टेंभुर्णीची फळ तोडून घेत पिकवून बाजारात नेऊन आर्थिक उदरनिर्वाहासाठी विक्री करतात टेंभुर्णीचे लाकूड लवचिक असते त्यामुळे लवकर पेटत नाही आणि भेटले तर लवकर विझत नाही फाट्यांचा पेटतांना कटकट आवाज येतो आदिवासी भागात बाळांतीन बाईला आंघोळीसाठी गरम पाणी करतात त्यावेळी टेंभुर्णीच्या वाळलेल्या लाकडाचा चुलीत जाण्यासाठी वापर करतात अशी माहिती आदिवासी संशोधक तथा यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक सुभाष कामडी यांनी दिली आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या